संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार, शिवसेनेची सणसणीत टीका

 जनतेला प्रवचन द्यायचा नैतिक अधिकार प्राप्त झाला आहे, असा सल्लाही शिवसेनेनं मोदींना दिला आहे.  (Shivsena on Corona PM Narendra Modi Speech)

मुंबई : “पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाचे संकट मोठे आहे. कोरोनाचे जणू तुफानच आहे, पण तुफानापासून बचाव कसा करायचा यावर उपाय त्यांनी सांगितला नाही. पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असे वाटले होते. पण ‘‘संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या,’’ हेच त्यांच्या भाषणाचे सार आहे. पंतप्रधान किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑक्सिजनपूर्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे. त्याऐवजी सगळेच जण हवेत भाषणांचा कार्बनडायऑक्साईड सोडून जहर फैलावीत आहेत,” अशी सणसणीत टीका शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून वाढता कोरोना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद यावर भाष्य केले आहे. (Shivsena Saamana Editorial on Corona And PM Narendra Modi Speech)लॉकडाऊन टाळण्याचा सल्ला कोणत्या आधारावर? 

महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन हाच पर्याय असताना पंतप्रधान मोदी यांनी ‘‘लॉक डाऊन टाळा’’ असा सल्ला दिला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कालच्या चोवीस तासांत 64 हजार रुग्ण एका महाराष्ट्रात झाले. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किमान 15 दिवसांसाठी संपूर्ण टाळेबंदी करा, अशी राज्याच्या अनेक मंत्र्यांची मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय तो निर्णय घेतीलच, पण ‘‘लॉक डाऊन टाळा’’ असा सल्ला आपले पंतप्रधान कोणत्या आधारावर देत आहेत? असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area