कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, गेल्या २४ तासांत पाच महिन्यांतील सर्वाधिक म्हणजे ८३२ नवीन रुग्ण (Patient) आढळले आहेत, तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण आणि मृत्यूची संख्या पाहता, पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा धोकादायक स्थितीकडे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करत ही रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.