येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार भाऊसो बाबू सुर्यवंशी (वय 85) यांचे मंगळवार 6 रोजी शाहूनगर चंदूर येथील राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
इचलकरंजी:
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जनक कॉ. भाऊसो सुर्यवंशी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय हक्क मिळवून देण्यास संघटनेची गरज ओळखून संघटना बांधणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. इचलकरंजी शहरात संघटना उभारल्यानंतर जिल्हा संघटना, महाराष्ट्र राज्य संघटना बांधणीसाठी त्यांचे कार्य बहुमुल्य आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांबरोबरच कामगारवर्ग व शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने करून त्यांना हक्क मिळवून दिला. त्यांच्या जाण्याने कामगार वर्गाची न भरून निघणारी हानी झाली आहे.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवगोंडा खोत, पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव आण्णा गुंडे, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी, सांगली वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मारूती नवलाई, कॉ. दत्ता माने, आनंदराव चव्हाण, ए. बी. पाटील, सदा मलाबादे, समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी, आप्पा पाटील, आण्णा पाटील, आप्पा परीट, बाळू माने, भरमा कांबळे, सुभाष कांबळे, जीवन कोणी, संजय टेके यांच्यासह सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व विक्रेते, कामगार वर्ग उपस्थित होता.
दरम्यान, भाऊसो सूर्यवंशी यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवार 8 रोजी संध्याकाळी 5 वाजता समाजवादी प्रबोधिनी येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे.