दोन सख्ख्या भावांच्या संसाराचा भनका, लग्न झालेल्या मुलींसोबत लग्न, तीन महिन्यांनी घर लुबाडलं, नंतर धक्कादायक खुलासे

 मध्य प्रदेशच्या ग्वालियर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलींनी दोन सख्ख्या भावांशी लग्न केलं. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात घरातील सर्व पैसे, दागिने लुबाडून धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे (Two brides robbed in Madhya Pradesh Gwalior city).


भोपाळ : काही घटना प्रचंड भयानक घडतात. एखाद्या चांगल्या कुटुंबाला लग्नाच्या निमित्ताने प्रचंड लुबाडलं जातं. या अशा घटना अनेकदा आपल्या कानावर पडतात. या अशा घटनांपासून आपण सतर्क होणं जास्त जरुरीचं आहे. नाहीतर आपल्याला देखील अशाच घटनेता मनस्ताप सहन कारावा लागू शकतं. मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथील एक कुटुंब सध्या अशाच काही मनस्तापाला सामोर जातंय (Two brides robbed in Madhya Pradesh Gwalior city).


जवळपास 15 लाखांची चोरी

मध्य प्रदेशच्या ग्वालियर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलींनी दोन सख्ख्या भावांशी लग्न केलं. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात घरातील सर्व पैसे, दागिने लुबाडून धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. आरोपी दोन्ही मुली या उज्जैनच्या रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या मुलींनी ज्या दोन भावांना लुटलं ते कपड्यांचे व्यवसायिक आहेत. दोन्ही मुलींनी घरातून 8 लाखांचे दागिने आणि 7 लाख रुपयांची रोख रक्कमची चोरी केल्याचं उघड झालंय (Two brides robbed in Madhya Pradesh Gwalior city).


एका मुलीला लग्नाआधीपासूनच एक मुलगा

याप्रकरणी पीडित कुटुंबाने घराच्या दोन्ही सून, याशिवाय लग्न जमावणाऱ्या नातेवाईकांविरोधात बिलौआ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे लग्न जमवताना दोन्ही मुलींच्या आई-वडिलांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं होतं. याशिवाय लग्नासाठी मुलाच्या कुटुबियांनी 7 लाख रुपये दिले होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता एका नवरीला आधीपासूनच एक मुलगा असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय उज्जैनमध्ये दोघींविरोधात फसवणुकीचा गुन्हा आधीपासूनच गुन्हा दाखल आहे.


नेमकं प्रकरण काय? सविस्तर माहिती

ग्वालियर शहरात बिलाऔ पोलीस ठाणे हद्दीत नागेंद्र जैन नावाचे कपड्यांचे व्यसायिक वास्तव्यास आहेत. त्यांनी डिसेंबर 2020 मध्ये दीपक जैन आणि सुमित जैन या दोन लहान भावांचं उज्जैनच्या नंदनी मित्तल आणि रिंकी मित्तल या दोन मुलींशी लग्न लावलं. त्यांचं लग्न या दोन्ही मुलींचा भाऊ संदीप मित्तल याच्यासमोर ठरलं होतं. संबंधित लग्न जैन कुटुंबाचे ओळखीचे बाबूलाल जैन यांच्या मध्यस्तीने ठरवण्यात आलं.


सासऱ्याला हृदय विकाराचा झटका

लग्नानंतर नंदनी आणि रिंकी जवळपास 15 ते 20 दिवस सासरी राहिल्या. त्यानंतर त्या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर 9 जानेवारी 2021 रोजी त्या त्यांचा भाऊ आकाश मित्तल सोबत सासरी आल्या. सासरी आल्यानंतर त्या सर्वात आधी सासऱ्याच्या खोलीत गेल्या. तिथे त्यांनी सासऱ्याजवळ काहीतरी कुजबूज केली. त्यानंतर त्यांच्या सासऱ्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यातच त्यांच्या सासऱ्याचं निधन झालं. सासऱ्याच्या तेराव्यानंतर दोघी बहिणींनी आजारी पडल्याचं नाटक केलं आणि त्या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर त्या परत सासरी आल्याच नाहीत.


नवऱ्या फरार झाल्याचं कुटुबियांच्या लक्षात आलं

जैन कुटुंबाने अनेकदा त्यांना सासरी बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या काहीतरी कारण सांगून येण्याचं टाळत राहील्या. त्यांच्या अशाप्रकारे वागण्याने जैन कुटुबियांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी घरातील पैसे, दागदागिने जागेवर आहेत का? याची खातरजमा करण्यासाठी कपाटमध्ये पाहिलं तर त्यांना मोठा धक्काच बसला. दोन्ही नव्या नवरी घरातील 8 लाखांचं सोनं आणि 7 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.


मुलींचं आधीच लग्न झाल्याचं उघड

जैन कुटुंबाने वारंवार त्यांना गोड बोलून घरी बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या यायला तयारच होईना. आरोपी मुलींचे फेसबुकवर अकाउंट आहे का, याची तपासणी केली असता त्यांचं आधीच लग्न झाल्याचं जैन कुटुबियांचं लक्षात आलं. याशिवाय नंदिनी मित्तल हीला एक लहान मुलगा देखील असल्याचं समोर आलं. फेसबुकवर तिचे नंदिनी प्रजापती आणि टीना यादव नावाचे दोन अकाउंट होते. तर रिंकी मित्तलचं नाव रिंकी प्रजापती असं होतं. या दोघी मुलींचा भाऊ संदीप मित्तलचं फेसबुकवर संदीप शर्मा असं नाव आढळलं. विशेष म्हणजे या सर्वांवर उज्जैनमध्ये याआधीदेखील लग्नाच्या नावाने फसवणूक केल्या गुन्हा दाखल आहे.


पोलिसात गुन्हा दाखल

हे लग्न जुळवणाऱ्या बाबूलाल जैन याने पीडित कुटुंबाला खोटी माहिती दिली होती. नंदनी आणि रिंकी यांच्या आई-वडिलांचा 2012 मध्ये आलेल्या चक्रीवादळात मृत्यू झाला होता. तसेत कुटुंब हे गरीब आहे, असं बाबूलाल जैन यांनी पीडित कुटुंबाला सांगितलं होतं. त्यामुळेच पीडित कुटुंबाने लग्नाच्यावेळी 7 लाख रुपये रोख रक्कम दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी नंदनी, रिंकी, आकाश, संदीप, बाबूलाल जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area