धुळ्यात तुफान राडा, आरोपींना सोडवण्यासाठी जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला, गोळीबारात दोघे जखमी

 आरोपींशी संबंधित असणाऱ्या गटाचे लोक थेट पोलीस ठाण्यावर चाल करुन आले. | Dhule Maharashtra
धुळे: नांदेडमध्ये जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता धुळ्यात काही लोकांनी थेट पोलीस (Police) ठाण्यावर हल्ला करुन आरोपींना पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे हा प्रकार घडला. (Violent mob attack on police station in dhule Maharashtra)


याठिकाणी बुधवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. एका मुलीची छेड काढल्यावरुन हा वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा आरोपींशी संबंधित असणाऱ्या गटाचे लोक थेट पोलीस ठाण्यावर चाल करुन आले.


या जमावाकडून पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. परिस्थिती हिंसक होत असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी गोळीबार केला. पोलिसांनी दोन फैरी झाडल्यानंतर या जमावातील लोक पळून गेले. मात्र, पोलिसांनी झाडलेल्या दोन गोळ्यांमुळे जमावातील दोनजण जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन गटांच्या हाणामारीवेळी एका व्यक्तीचा मृत्यूही झाल्याचे समजते. या घटनेमुळे सध्या दोंडाईचा शहरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या दोंडाईचामध्ये दाखल झाले आहेत.


नांदेडमध्ये पोलिसांवर तलवारीने हल्ला

नांदेडमध्ये दरवर्षी शीख समाजाकडून होळीनिमित्त होला मोहल्ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र तरीही नांदेडमध्ये शीख समुदायाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते. या मिरवणुकीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आले


वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने काही शीख तरुणांनी नांदेडमध्ये गोंधळ घातला. बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच परिसरातील गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area