मुंबईत सुनावणीनंतर तुरुंगात परतताना पोलिसांची गाडी उलटली, कैद्याचा मृत्यू

 नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात कैदी श्रावण बावणे याचा जागीच मृत्यू झाला. ( Wardha Police Car Accident)
वर्धा : मुंबईत न्यायालयातील हजेरीनंतर भंडारा येथे परत जात असताना पोलिसांच्या वाहनाला टायर फुटून अपघात झाला. यामध्ये भंडारा कारागृहातील कैद्याचा मृत्यू झाला, तर वाहन चालकासह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. हा अपघात नागपूर ते अमरावती महामार्गावरील कारंजा (घाडगे) जवळील राजणी फाट्यावर घडला. (Wardha Police Car Accident kills Prisoner Returning From Mumbai Court Hearing)


नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर अपघात

भंडारा कारागृहातील 65 वर्षीय कैदी श्रावण बावणे (रा. नागपूर) याला मुंबई येथील न्यायालयात हजेरीसाठी नेण्यात आले होते. काल न्यायालयात पेशीनंतर परत भंडारा येथे आणत असताना नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. राजणी शिवारात अचानक पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.

तीन वेळा पटून पोलिसांची गाडी विरुद्ध दिशेला

अपघातात वाहनाने रस्ता ओलांडून जवळपास तीन चार पलट्या घेतल्या. त्यानंतर विरुद्ध रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहिले. या अपघातात कैदी श्रावण बावणे याचा जागीच मृत्यू झाला. तर तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. अभिषेक घोडमारे, सावन जाधव, शकील शेख, चालक राजेश्वर सपाटे हे कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


पोलिसांच्या गाडीला अपघाताची वर्ध्यात पुनरावृत्ती

दरम्यान, आर्वी येथून विरुळ मार्गे वर्ध्यात साप्ताहिक परेडसाठी जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी (जून 2019) घडली होती. या घटनेत सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.


वर्ध्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाड्याच्या फांद्या पडल्या होत्या. आर्वी येथून विरुळ मार्गे वर्ध्यात साप्ताहिक परेडसाठी जात असताना रस्त्यावर झाडाची एक फांदी कोसळली होती. या फांदीमुळे गाडीला अपघात होऊ नये या हेतूने चालकाने गाडी थोडी वळवली. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली होती.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area