आम्ही रोज पाहतो मरण, तरीही रचतो सरण, पंचगंगा स्मशानभूमीतील चित्र.

 


कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाला खांदा तर दूरच, त्याच्या जवळही जाण्यास नातेवाईक धजावत नसताना, थेट कोरोनाशी सामना करीत पंचगंगा स्मशानभूमीतील (cemetery) २० कर्मचारी रोज अशा मृतदेहांवर अग्निसंस्कार  (Cremation) करत आहेत. मृतदेहाला हाताळणे म्हणजे साक्षात मरणालाच आमंत्रण देण्यासारखे. मात्र आपले पहिले कर्तव्य म्हणून या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत २६०, तर गेल्या चार दिवसांत ८५ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. पुरेशी दक्षता घेतल्याने त्यापैकी आजअखेर एकही कोरोनाबाधित झालेला नाही, ही चांगली बाब आहे.


गेल्या दोन महिन्यांत २६० कोरोनाग्रस्त मृतांवर (dead) पंचगंगा स्मशानभूमीतील  कर्मचाऱ्यांनी अग्निसंस्कार केले आहेत. गेल्या चार दिवसांत तर मोठी भयाण स्थिती येथे आहे. तीन पाळीत ८ - ८ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकूण ८५ कोरोनाग्रस्तांवर, तर इतर व्याधींनी मृत झालेले २५, अशा एकूण ११० जणांवर अंत्यसंस्कार केले. प्रत्येक कर्मचारी पीपीई कीट घालून, सॅनिटायझरचा वापर करून हे कार्य करीत आहे.अनेकांच्या अंत्यसंस्काराला (Funeral) एक, दोन अथवा काहीवेळेला कोणच नसते. अशावेळी त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक होऊन तो मृतदेह हाताळणे आणि सर्व सोपस्कारही येथील कर्मचारी करतात. दुसऱ्यादिवशी रक्षाही ते विसर्जित करतात. कोरोना मृतावर एक मण लाकूड व साडेचारशे शेणी हे कर्मचारी रचतात.

त्यानंतर स्वत:च कापूर घेऊन त्यावर आपलाच नातेवाईक असल्याप्रमाणे मृतदेहाला संसारी मोहातून सुटका मिळावी, म्हणून हराटी मंत्र म्हणून अग्निसंस्कार (Cremation) करतात. ऐन उन्हाळ्यात कोरोना संसर्गाने मृत होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एकाबाजूने सरणाच्या आगीच्या ज्वाळा आणि वरून उन्हाच्या तीव्र झळा सोसून हे कर्मचारी इमाने इतबारे सेवा बजावत आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area