‘मर्डर’मधील बोल्ड दृश्यानंतर लोकांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलली, मल्लिका शेरावतने व्यक्त केलं दुःख!

मुंबई : आपल्या हॉट अदांनी अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) हिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली. ‘मर्डर’ (Murder) या चित्रपटातून ती रातोरात सुपरस्टार बनली. मल्लिकाचा हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेता इमरान हाश्मीसोबत ती चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, इतक्या वर्षानंतर आता अभिनेत्रीने चित्रपटात तिने दिलेल्या बोल्ड दृश्यांविषयी आपले मत व्यक्त केले आहे (Actress Mallika Sherawat breaks the silence over murder film bold seen).

अलीकडेच अभिनेत्रीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चित्रपटातील बोल्ड दृश्यांनंतर लोक तिच्या बद्दल काय विचार करू लागले होते. आता 17 वर्षानंतर अभिनेत्रीने असे म्हटले आहे की, या चित्रपटात बोल्ड सीन दिल्यावर लोकांनी जवळपास तिची नैतिक दृष्ट्या हत्याच केली होती.


मल्लिकाबद्दल बदलला लोकांचा विचार

मल्लिका शेरावत म्हणाली की, मर्डर फिल्म केल्यावर मला लोकांमध्ये एक खालच्या दर्जाची महिला म्हणून पाहिले गेले होते. जर आज मी या चित्रपटांबद्दल विचार केला तर, आता हे सगळं सामान्य झालं आहे. मात्र, त्यावेळी नव्हतं. कदाचित याचमुळे आता लोकांचा या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता सिनेमा काळाबरोबर बदलत चालला आहे. सर्व प्रकारचे चित्रपट लोक पाहतात आणि पसंत देखील करतात (Actress Mallika Sherawat breaks the silence over murder film bold seen).


मल्लिका आणि इमरान हाश्मीने ‘मर्डर’ या चित्रपटात अनेक चुंबन दृश्ये दिली होती. पण, एकदा इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये सांगितले होते की, मल्लिक शेरावत पडद्यावरील सर्वात वाईट ‘किसर’ आहे. या वक्तव्याने अभिनेत्रीला खूप वाईट वाटले होते आणि त्या अभिनेत्याला उत्तर देताना ती म्हणाले की, तिने ज्या सापाला कीस केले होते, तो इम्रान हाश्मीपेक्षा चांगला किसर होता. मात्र, ‘मर्डर’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही हे दोन्ही स्टार पुन्हा कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.


बऱ्याच चित्रपटानंतर मल्लिका झाली गायब!

‘मर्डर’ या सुपरहिट चित्रपटात मल्लिका शेरावत ‘सिमरन’च्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते. चित्रपटाची गाणी चांगलीच गाजली होती. त्यानंतर मल्लिका ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘आप का सूरूर’, ‘वेलकम’ आणि ‘डबल धमाल’ या सिनेमांमध्ये दिसली होती. 2019 मध्ये, मल्लिकाने ऑल्ट बालाजीची वेब सीरीज ‘बू सबकी फाटेगी’ द्वारे डिजिटल विश्वात पदार्पण केले. या सीरीजमध्ये ती तुषार कपूरसोबत दिसली होती. मात्र, त्यानंतर सध्या ती मनोरंजन विश्वातून गायब झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area