Air India Data leaks | एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला, प्रवाशांच्या पासपोर्टसह क्रेडिट कार्डचा डेटा लीक

 

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील विमानसेवा कंपनी असलेल्या एअर इंडिया (Government Airlines Air India) च्या प्रवाशांचा (Passengers) चा डेटा लीक (Data Leak) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला (Cyber Attack) झाला आहे.  या सायबर हल्ल्यात प्रवाशांचे वैयक्तिक तपशीलही चोरीस गेले आहेत. ज्यात क्रेडिट कार्ड, पासपोर्टसह इतर माहितीचा समावेश आहे. (Air India servers hacked Massive cyberattack leaks credit card details passport info of Air India passengers)

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया कंपनीच्या डेटा सेंटरवर झालेला हा सायबर हल्ला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला आहे. नुकतंच एअर इंडियाने त्यांच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या सायबर हल्ल्यात अनेक प्रवाशांची वैयक्तिक माहिती चोरी झाली आहे. यात जवळपास 45 लाख प्रवाशांचा डेटा चोरी करण्यात आला आहे. यात देशासह परदेशातील प्रवाशांच्या माहितीचा समावेश आहे. 


एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 दरम्यान प्रवाशांचा डेटा लीक झाला आहे. यात जन्म तारीख, नाव, संपर्क, पासपोर्टची माहिती, तिकिटाची माहिती, पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड संबंधी माहितीचा समावेश आहे. आम्हाला डेटा प्रोसेसरकडून या संदर्भातील पहिली माहिती 25 फेब्रुवारी 2021 रोजी मिळाली होती. यानुसार 25 मार्च 2021 ते 5 एप्रिल 2021 पर्यंतचा आकडेवारीवर परिणाम दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area