अल्पवयीन तरुणीवर दोन महिने बलात्कार, पीडिता प्रेग्नंट, 60 वर्षीय वृद्धाला बेड्या

पाटणा : अल्पवयीन तरुणीवर 60 वर्षीय वृद्ध दोन महिन्यांपासून सातत्याने बलात्कार करत असल्याची घटना बिहारमध्ये समोर आली आहे. चाकूच्या धाकाने वृद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक करुन तपास सुरु केला आहे. (Bihar Crime News Old Man allegedly Rapes Minor Girl)

चाकूच्या धाकाने दोन महिने बलात्कार

बिहारमधील गयामध्ये 16 वर्षीय तरुणीवर तिच्याच गावात राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाने बलात्कार केला. आरोपी आशिक मियां चाकू दाखवून आपल्याला धमकावत असे. जीवे मारण्याच्या भीतीने आपण गप्प राहिले, असं पीडितेने सांगितलं. दोन महिने तो तिच्यावर बलात्कार करत होता. मात्र ती गरोदर राहिल्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी पीडितेसह पोलीस स्टेशन गाठलं.


पोलिसांकडून वृद्धाची चौकशी

पीडित अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपी आशिक मियां याला अटक केल्याची माहिती महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी रविरंजना यांनी दिली. तरुणीची वैद्यकीय चाचणी करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आरोपीची चौकशी केल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असं पोलिसांनी सांगितलं.


मध्य प्रदेशात घरमालकाच्या मुलाकडून चिमुकलीवर बलात्कार

मध्य प्रदेशात 12 वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालिका आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत असलेल्या घराच्या मालकाच्या मुलानेच मित्रासह तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ही चिमुकली घरमालकाच्या आरोपी मुलाला दादा मानून राखी बांधत असे. (Bihar Old Man Rapes Girl)


जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार

ग्वाल्हेरमधील ‘चार शहर का नाका’ या भागात पीडित 12 वर्षांची चिमुरडी आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होती. बालिका गेल्या आठवड्यात आपल्या खोलीतून बाहेर आली, तेव्हा घरमालकाचा मुलगा नीलू आणि त्याचा मित्र सत्यम तिथे होते. दोघांनी बालिकेचे तोंड दाबून तिला आपल्या खोलीत उचलून नेले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत नीलूने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.


घरातील सदस्य जागे झाले आणि…

नीलूनंतर सत्यमनेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र इतक्यात घरात राहणारे इतर भाडेकरुही जागे झाले. संधीचा फायदा उचलत बालिकेने आरोपींना धक्का दिला आणि पळ काढला. घरी धाव घेत तिने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर चिमुरडीला घेऊन कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area