उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर आले, आनंद आहे : चंद्रकांत पाटील

                                           

पुणे : सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे,  अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तौत्के चक्रीवादळानंतर (Cyclone Tauktae) झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरुनच चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. (BJP Maharashtra president Chandrakant Patil attacks on CM Uddhav Thackeray over konkan tour)

पंतप्रधानांच्या दौऱ्यावर स्पष्टीकरण 

पंतप्रधानांच्या पाहणीवेळी सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे पंतप्रधानांना हवाई पाहणी करण्याचा गुप्तचर यंत्रणांचा सल्ला होता. महाराष्ट्रातील हवामान हे पंतप्रधानांच्या पाहणी दौऱ्यासाठी योग्य नव्हते म्हणून मोदी महाराष्ट्रात आले नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.


वादळात मृत्यू झालेल्या प्रत्येकाला दोन लाख रुपयांची सरसकट मदत मोदीजींनी गुजरातमधून घोषित केली आहे. ही मदत केवळ गुजरातला केली हा प्रचार चुकीचा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


मोदी 400 जागा जिंकतील

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं आहे. उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता.

उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area