hasan mushrif: मुश्रीफ, उठ्या सुट्या बोलत छूटया; भाजप कार्यकर्ते संतापले

'ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राजकीय संकेत पायदळी तुडवत अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरली. खालच्या दर्जाला जाऊन आणि सातत्याने दादांच्या बद्दल उठसूट तोंड सुख घेणे हे त्यांच्या कोणत्या संस्कृतीत बसते? एका बाजूला सत्ता येण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहित सर्वच शिवसेना नेते अत्यंत धर्माध आणि जातीवादी या महाशयांना वाटत होते. मात्र सत्तेचा बिछाना उबवत असताना ते सातत्याने सर्वच मंत्र्यांची तळी उचलून धरताना चमचेगिरी वजा वकिली स्वीकारली आहे का ?', असा सवाल कोल्हापुरातील काही भाजप कार्यकर्त्यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. (BJP workers angry with Rural Development Minister Hasan Mushrif)

चंद्रकांत पाटील यांना मस्ती आली आहे असा आरोप ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी रविवारी केला होता. याला प्रत्युत्तर देताना ऊठसूट चंद्रकांत पाटील यांच्या वर बोलणे , आता चालून घेणार नाही असा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे.


भाजप कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, हिमाचल, पंजाब सरकार बद्दल शेतकरी आंदोलन अथवा बिगर भाजपा राज्यातील सरकार बद्दल बोलल्यावर लगेचच मुश्रीफ महाशयांना राग येतो. खरे पाहिले, तर ज्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम पाहतात त्या जिल्ह्याची उठाठेव करण्याऐवजी उठसूट कागल मध्ये बसून चंद्रकांत दादाच्या नावाने खडे फोडणे बंद करावे. जिथे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील जनता "आपण यांना पाहिलेत का?" म्हणून टाचा घासत आहेत, टाहो फोडत आहेत ते पाहण्याऐवजी जग मान्य नेतृत्व असणाऱ्या व हे विश्वची माझे घर असे संकेत पाळणाऱ्या व देशापुढील सर्वच संकटांचा मुकाबला समर्थपणे करणाऱ्या आदरणीय पंतप्रधानांवर ही कार्यक्षमतेचा आरोप करणाऱ्या या मुश्रीफांना लाज वाटली पाहिजे !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area