दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान, जनहित याचिका दाखल

 

पुणे: महाराष्ट्र सरकारनं कोरोन विषाणू संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेतली जाणारी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. (Dhananjay Kulkarni Professor at Pune file PIL in Bombay High court demanding cancel state govt decision regarding SSC exam)


जनहित याचिका कुणी दाखल केली?

महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. ही याचिका पुणे येथील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली.


आक्षेप काय?

धनंजय कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करताना राज्यात दहावीचे अनेक बोर्ड आहेत, त्यापैकी केवळ एसएससी बोर्डाने परीक्षा रद्द केली आहे, असा दावा केला. राज्यातील दहावीच्या इतर बोर्डांचा अजून निर्णय झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा , अशी मागणी याचिकेत केली आहे.


दहावीचा निकाल कसा लावणार?

महाराष्ट्र सरकारनं दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिलला जाहीर केला होता. तेव्हा सीबीएसई बोर्डानं घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन निकाल जाहीर करण्याबाबत भूमिका घेऊ, असं म्हटंल होतं. सीबीएसई बोर्डानं दहावीचा निकाल कसा जाहीर करणार याविषयीची नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ निकाल कसा जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area