व्हॉट्सअॅप स्टेटसवरून वाद; पुण्यातील 'या' सराईत गुन्हेगाराचा खून

पुणे: व्हॉट्सअॅप स्टेटसवरून झालेल्या वादानंतर टोळक्याने बिबवेवाडी येथे सरोजिनी क्लिनिकसमोर एका सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात वार करून त्याचा खून केल्याची घटना शनिवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Pune Crime Latest News )


माधव हनुमंत वाघाटे (वय २८, रा. रजनी कॉर्नर, बालाजीनगर धनकवडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाघाटे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसचे, त्याला पूर्वी तडीपार करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव वाघाटे, सुनील खाटपे व सारंग गवळे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी रात्री सारंग गवळी व सुनील खाटपे यांच्यात व्हॉट्सअॅप स्टेटसवरून वाद झाला होता. गवळी याने कामठे नावाच्या तरुणाचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते. खाटपे व कामठे यांचे पूर्वीचे वाद आहेत. त्यामुळे खाटपेने गवळीला कामठेचे ठेवलेले स्टेटस काढून टाकण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर गवळी त्या ठिकाणाहून निघून गेला होता. खाटपे याने या वादाची माहिती मित्र असलेल्या वाघाटे याला फोन करून देत बोलवून घेतले. गवळीला मिळून धडा शिकवू असे त्याने सांगितले.


वाघाटे हा खाटपेला भेटण्यासाठी बिबवेवाडी परिसरात आला होता. सरोजनी क्लिनिकजवळ खाटपेची वाट पहात वाघाटे थांबला होता. त्यावेळी गवळीचे आठ ते दहा साथीदार त्या ठिकाणी आले. त्यांनी वाघाटेवर बांबू, दगड, लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याच्या डोक्यात, तोंडावर वार करून गंभीर जखमी केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर टोळके निघून गेले. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीचा माग काढण्यास सुरूवात केली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर या अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area