पंतप्रधान आज साधणार जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद.

                                               

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता कोल्हापूरसह राज्यातील १७ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार  (communicate)आहेत. त्यात ते कोरोनाविषयक आढावा घेणार असून यासंबंधित करावयाच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी ते बोलणार थेट आहेत.


देशासह राज्यात सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून बाधितांच्या व मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातदेखील रोजच्या पॉझिटिव्ह रुग्णांची  (Patients)संख्या १२०० ते १५०० पर्यंत आहे. मृत्यूदरदेखील जास्त आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी पंतप्रधान मोदी हे देशातील विविध जिल्ह्यांशी संवाद साधणार (communicate) आहेत. त्यात महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. याअंतर्गत ते कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठीच्या महत्त्वपूर्ण सूचना करतील, अशी शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area