मराठा आरक्षणाबाबत आज कोल्हापुरात बैठक.

                                

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Reservations) रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने समाजामध्ये असंतोष आहे. याबाबत खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तत्पूर्वी कोल्हापुरातील कायदेतज्ज्ञ, तालीम संस्थांच्या प्रतिनिधींशी आज, सोमवारी चर्चा करणार आहेत.

राज्यातील मागील व सध्याच्या सरकारने मराठा समाजाचा खेळ केला असून मराठा आरक्षणाचा   (Reservations)  कायदा योग्य पद्धतीने केला नसल्याने समाजावर ही वेळ आल्याचे खासदार संभाजीराजे यांचे म्हणणे आहे. आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला २७ मेचा अल्टीमेटम दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील समाजाशी संवाद साधून पुढील रणनीती काय ठरवावी, याची चाचपणी करणार आहेत.


कोल्हापुरात आज सकाळी ११ वाजता शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे शहरातील कायदेज्ज्ञ, तालीम संस्थांचे प्रतिनिधींसोबत संभाजीराजे चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते राज्यभर दौरा करून समाजाची चर्चा करणार आहेत. २७ मे रोजी मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून संभाजीराजे पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.


संभाजीराजे आज शाहू महाराजांना अभिवादन करणार

कोल्हापुरातील बैठकीला जाण्यापूर्वी खासदार संभाजीराजे हे नर्सरी गार्डन, टाऊन हॉल येथे जाऊन रजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन करणार आहेत.


संघर्ष समितीची ३ जूनला दिशा ठरविणार

मराठा आरक्षणामध्ये राज्य सरकारने (Government)  योग्य मांडणी न केल्याने समाज अडचणीत आला. आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई कशी लढायची यासह एकूणच दिशा ठरविण्यासाठी ३ जून रोजी कोल्हापुरात मराठा आरक्षण संघर्ष समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area