पोलिसांना खोटा जबाब देणेसाठी राजारामपूरी पोलिसांनी केलेली अमानुष मारहाण आणि इतर अन्याया विरोधात वरीष्ट पोलिस अधिकारी यांच्याकडून न्याय मिळावा . राकेश व रोहित रेंदाळकर बंधू यांची मागणी .

कोल्हापूर – खोटा जबाब देणेसाठी दबाव आणून सुभाषनगर पोलिस चौकीसह राजारामपुरी पोलिस स्थानकात धमकीसह अर्वाच्य शिवीगाळ व मारहाण करत माझे शारिरीक व मानसिक खच्चीकरण करणारे राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांच्या विरोधात आपण वरिष्ट पोलिस अधिकारी यांचेकडे दाद मागितली असून त्यांनी त्याची योग्य दखल घेतली आहे , व त्याची नोंदही घेतली आहे . तरी आपणांस यथायोग्य न्याय मिळावा अशी अर्त मागणी राकेश रेंदाळकर यांनी केली आहे . या संदभात त्यांनी स्वत : दिलेली माहिती अशी शिवाजी उद्यमनगर येथे राहणारा राकेश रेंदाळकर हा पृथ्वी सप्लायर्स मध्ये सुपरवायझर पदावर काम करतो . दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 5.00 च्या दरम्यान माझ्या घराजवळून 3 पोलिसांनी मला माझ्या गाडीवर बसवून सुभाषनगर येथील पोलिस चौकीत नेवून डांबून ठेवले व तेथे शिव्या देत लाथा बुक्यांनी प्रचंड मारहाण केली . तेथून मला राजारामपुरी पोलिस स्थानकात घेवून गेले . पोलिस महेश पोवार , सुरेश काळे आणि आणखीन एक पोलिसाने खोटा जबाब दे म्हणून माझ्यावर दबाव आणला . मी ठाम नकार दिल्यावर त्यांनी मला पोलिस अधिकारी सिताराम डुबल यांच्या केबिनमध्ये त्यांच्या समक्ष नेले , तेंव्हा त्यांनी हा खोटा कबुली जबाब देत नसल्यास याची चमडी सोला , मारून टाकला तरी चालेल " असे सांगितल्यावर महेश पोवार , सुरेश काळे व एक पोलिस यांनी मला पट्टयांनी व लाथांनी मारहाण केली , या अनपेक्षित मारहाणीने मी पुरता घाबरून गेलो , त्यानंतर त्यांनी मला पोलिसांच्या बोलेरो गाडीमधून सुमेध भोसले याच्या उमा टॉकीज जवळील घरी घेवून गेले . तो घरी नसल्याचे समजल्यावर परत तेथून मला राजारामपुरी पोलिस स्थानकात घेवून आले व तेथून मला राकेश नागदेव याच्या दुकाना जवळ घेवून गेले . त्याचे दुकान बंद होते व तो तेथे नव्हता . तेथेच मला गालावर जोरदार ठोसा मारला , पाच वर्षांपूर्वी माझे जबड्याचे ऑपरेशन झाले असल्याने मला अत्यंत जिव घेण्या वेदना झाल्या . यानंतर मला घरी सोडण्यात आले .

 या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास तुला मोक्का सारख्या मोठ्या गुन्ह्यात अडकवू शकतो असे धमकीवजा सांगून ते निघून गेले . या प्रचंड अनपेक्षित मारहाणीमुळे मी घाबरून घरी बसून राहिलो . थोड्या वेळानंतर मला माझ्या घरच्यांनी विश्वासात घेतल्यानंतर मी माझ्या चुलत भावासमवेत सेवा रूग्णालय , कसबा बावडा येथे जावून वैद्यकीय उपचार घेतले . या प्रकरणा संदभात मी लेखी तक्रार अर्ज राजारामपुरी पोलिस स्थानकात केली होती . दिनांक 14 मे रोजी मी केलेल्या तक्रार अर्जा संदभात सहाय्यक पोलिस निरिक्षक बी.बी. शिंदे हे माझ्या घरी येवून माझ्या तक्रार अर्जाची दखल घेतली आहे , लवकरच आपणांस बोलवले जाईल असे सांगितले . या प्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेकडेसुध्दा लेखी तक्रार केली असता त्यांनी पोलिस उपअधिक्षक आर.आर. पाटील यांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत . आमचा त्यांच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे . याची रितसर फिर्याद नोंदवून समद न्याय मिळावा आणि मला व माझ्या कुटूंबियांना मानसिक तणावातून मोकळे करावे अशी आपली रास्त अपेक्षा राकेश रेंदाळकरांनी व्यक्त केली आहे . याच बरोबरीने रोहित रेंदाळकर यांनी दिलेली माहीती अशी- भागीदार असलेल्या कंदलगाव येथील कॅफे पनामा दि स्पोर्टस लाऊंज या सध्या लॉकडाऊन काळात बंद असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी बेकायदेशिरपणे गेटवरून उड्या मारून व आतील शटरचे लॉक तोडून हॉटेलमध्ये शिरकाव केला होता . त्याचे सर्व सी.सी.टी.व्ही . फुटेजही उपलब्ध आहे , या विरोधातही स्थानिक व जिल्हा पोलिस प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत . या दोन व इतर अनेक बेकायदेशिर कारभारामुळे पोलिसांविषयी सामान्यांमध्ये नाहकपणे दहशत निर्माण होत आहे . तसेच राजारामपुरी परिसरातील व्यापारी , उद्योजक हे अत्यंत मानसिक तणावात जगत आहेत , या अन्याया विरोधात कोल्हापूरचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी युध्द पातळीवर लक्ष घालून या दोन्ही घटनांची रितसर फिर्याद नोंद करून आम्हास न्याय देतील , यासाठी आम्ही प्रचंड आशावादी असून लोकशाही मार्गाने लोकप्रतिनीधींपासून ते न्यायालयापर्यंत दाद मागणार आहोत , कोल्हापूरची स्वाभीमानी जनता यामध्ये आमच्या बाजून उभी राहील असा ठाम विश्वास राकेश आणि रोहित रेंदाळकर बंधूंनी व्यक्त केला आहे . “ पावसाने झोडपले आणि राजाने बदडले , तर दाद कुठे बघायची " अश्या हतबल परिस्थितीत आम्ही आहोत . मात्र वरिष्ट अधिकारी आमच्या अन्यायावर योग्य ती दखल घेतील असा विश्वासही राकेश आणि रोहित रेंदाळकर यांनी व्यक्त केला आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area