ऊर्जा फौंडेशन माणकापूर यांच्या वतीने कोरोना जनजागृती अभियान

कोरोनाचा रोगाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. शहरी भागा नंतर आता ग्रामीण भागात कोरोनाने  शिरकाव केला आहे..  या आजाराविषयी ग्रामीण भागात जास्त जागृती नसल्याने या आजाराविषयी नागरिकांच्यात अनेक गैरसमज पसरले आहेत.

अनेक  नागरिक भीती च्या छायेखाली जगत असून त्यांना या रोगाविषयी सविस्तर माहिती व्हावी, तसेच लोकांमधील भीती नाहीशी व्हावी. व  त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे याविषयी जनजागृती करण्यात आली..

    यामध्ये प्रामुख्याने लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टराना भेटून उपचार घेणे. मास्क सॅनिटायझरचा वापर करणे.सोशल डिस्टन्स पाळणे, जास्तीत जास्त घरीच रहाणे,  पोलीस प्रशासन, ग्राम पंचायत, आरोग्य विभागाला सहकार्य करणे. प्राणायाम योगा सारखे व्यायाम करणे, गरम ताजे पदार्थ,,फळे खाणे, डॉक्टरांनी सांगितल्यास कोव्हिडं तपासणी करून घेणे, तज्ञांनी सांगितलेल्या काढ्याचे सेवन करणे. आजाराला न घाबरता वेळेत उपचार करणे. या व अशा अनेक आवश्यक गोष्टींची माहिती नागरिकांना देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करतांना प्रवीण निंगणुरे(सी एस ) यांनी कोरोना आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. व कोरोना बद्दल समज गैरसमज , अफवाावर विश्वास न ठेवता प्रशासनाने सांगितलेल्या नियमांच पालन करणे, हेच कोरोना पासून आपले रक्षण करण्याचे साधन आहे असे ते म्हणाले. तसेच ऊर्जा फौंडेशन कोरोना काळात ग्राम पंचायत व प्रशासनाल सहकार्य करेल असे सांगितले. व ग्राम पंचायतने गावात कोव्हिडं सेंटर सुरु केल्यास ऊर्जा फौंडेशन सर्वोतोपरी सहकार्य ग्राम पंचायत ला करेल असे ते म्हणाले,

तसेच लहान मुलांसाठी येत्या 4 जून ते 8 जून पर्यंत विनामूल्य ऑनलाईन बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले असून यामध्ये तज्ञांच्या कडून मार्गदर्शन मिळणार आहे.याचा लाभ प्रत्येक विध्यार्थ्यानी व पालकांनी घ्यावा असे फौंडेशनच्या वतीने त्यांनी आवाहन केले आहे.

     यावेळी ग्रा. प.सदस्य अनिल आरगे, विजय माळी(माजी कृषी अधिकारी), राहुल वराळे (पत्रकार), महावीर चौगुले, प्रकाश आरगे,रणजित बत्ते, गिरीजाशंकर माने व सदलगा पोलीस बीट असकी हे उपस्थित होते. गावातील मुख्य चौका चौकात जनजागृती करण्यात आली यावेळी शासनाच्या सर्व नियमांचं पालन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area