*धक्कादायक : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या* रत्नागिरी : नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पहाटेच्या सुमारास पत्नीचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून करुन पतीने स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरानजीक कुवारबाव येथील अनुराधा अपार्टमेंटमध्ये हि घटना घडली. मंगळवारी, सकाळी हि घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली.  


 मूळचे नाशिक  येथील असलेले रोहित राजेंद्र चव्हाण (वय-29) आणि पूजा रोहित चव्हाण (वय-28) हे दांपत्य 12 वर्षांपूर्वी रत्नागिरीला राहायला आले होते. त्यांना 10 वर्षांची मुलगी आहे. 

 

माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. यावेळी पूजाचा मृतदेह बिछान्यावर होता तर रोहितचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकत होता. रोहित याला नोकरी नसल्याने नैराश्येतून हे कृत्य केल्याचा पोलिसांनि प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अनिल लाड अधिक तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area