मोठी बातमी: नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याची गळफास लावून आत्महत्या

 नाशिक: शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकारी उमेश नाईक यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या जुन्या घरी गळफास घेऊन नाईक यांनी आत्महत्या (Suicide) केली. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उमेश नाईक आर्थिक विवंचनेत होते. या कारणामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पंचवटी पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे. (Shivsena leader Umesh Naik suicide in Nashik)


प्राथमिक माहितीनुसार, उमेश नाईक काळाराम परिसरात राहत होते. मात्र, त्यांचे जुने घर नागचौक परिसरात आहे. या घराचे रंगकाम करायचे आहे, असे पत्नीला सांगून उमेश नाईक घराबाहेर पडले होते. बराच वेळ घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना फोन केला. मात्र, उमेश नाईक यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने काहीजण त्यांना शोधण्यासाठी जुन्या घरी गेले.


त्याठिकाणी पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. अखेर घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा स्लॅबच्या गजाला लटकून उमेश नाईक यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.


वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

कोरोनाची दुसरी लाट गुजरातसह संपूर्ण देशात हाहाकार माजवत आहे. यातही सौराष्ट्रमध्ये कोरोनाचा प्रकोप शिगेला पोहोचलेला आहे. भगवान श्रीकृष्णाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवभूमी द्वारकेतही कोरोनामुळे एका कुटुंबानं आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. द्वारकेतल्या एका कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनाने निधन झालं, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली.


द्वारका येथील रहिवासी जयेश भाई जैन नाश्त्याचे दुकान चालवत होते. गुरुवारी रात्री कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा निधनाची बातमी समोर आली, तेव्हा संपूर्ण कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जयेश भाईचा अंत्यसंस्कार करून त्यांची पत्नी साधना बेन आणि दोन मुले कमलेश आणि दुर्गेश जैन यांनीही आत्महत्या केली. या तिघांनीही विष प्राशन करून स्वत: ची जीवनयात्रा संपवल्याचं सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area