नाशिकच्या बिटको रुग्णालयात राडा, भाजप नगरसेविकेच्या पतीकडून तोडफोड करत अधिकाऱ्यांना शिवीगाळ

                                

नाशिक: भाजप नगरसेविकेच्या पतीने नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात मोठा राडा केला असून, हॉस्पिटलच्या काचा फोडत शिवीगाळ केल्यानं एकच खळबळ उडालीय. इनोव्हा गाडी थेट हॉस्पिटलमध्ये घुसवून त्याने धिंगाणा घातलाय. भाजप नगरसेविकेच्या पतीच्या या दादागिरीनं महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच मोठं नुकसान झालंय. भाजप नगरसेविका सीमा ताजने यांच्या पतीनं हा प्रताप केलाय. पोलिसांनी रुग्णालय बंद केले असून, सध्या नागरिकांची बाहेर गर्दी झाली आहे. (Nashik Bitco Hospital vandalized BJP corporator husband vandalized and insulted the officials at Bitco Hospital in Nashik)


राजेंद्र ताजने यांनी मद्यधुंद अवस्थेत अक्षरश: धिंगाणा घातला

नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये भाजपा नगरसेविका सीमा ताजने यांचे पती राजेंद्र ताजने यांनी मद्यधुंद अवस्थेत अक्षरश: धिंगाणा घातला. आपल्या इनोवा कारमधून थेट हॉस्पिटलचा काचेचा दरवाजा फोडत ताजनेंनी बाहेर उतरून इथल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला.


ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची इनोव्हा कार थेट आतमध्ये नेली

नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी देण्यात आलेय. या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत असून, अनेकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज लागते. रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळाले नसल्यानं ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची इनोव्हा कार थेट आतमध्ये नेली आणि तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area