वेळ आली तर हसन मुश्रीफांना मलाच विकावं लागेल

 

हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ (political leader) यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावं लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भातही भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाच्या विषयावर बोललं पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी सरकारने चांगले निवृत्त न्यायमूर्ती नेमावेत. गायकवाड आयोगाने ज्या निष्ठेने काम केले, तसेच काम आताही झाले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. तुम्ही जामिनावर बाहेर आहात, त्यामुळे सांभाळून बोला, असा सूचक इशारा चंद्रकांतदादांनी दिला होता. यावर हसन मुश्रीफ यांनी आक्षेप नोंदवला होता. लोकशाहीमध्ये अशाप्रकारे धमकावणे योग्य नाही. गेल्यावेळीही चंद्रकांत पाटील यांनी आमचा अपमान केला होता. त्यामुळे आता मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे हसन मुश्रीफ (political leader) यांनी म्हटले होते. (politics news)


काही दिवसांपर्वीच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area