Corona Update: राज्यात दिवसभरात 34 हजार 389 नवे रुग्ण

महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. राज्यात रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 34 हजार 389 नव्या रुग्णांची (patients) नोंद करण्यात आली आहे, तर 59 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 974 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 81 हजार 486 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 53 लाख 78 हजार 452 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 48 लाख 26 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. राज्यात सध्या 4 लाख 68 हजार 109 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यातील रुग्ण  (patients) बरे होण्याचे प्रमाण 89.74% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 4,68,109 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, आज नोंद झालेल्या एकूण 974 मृत्यूंपैकी 415 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 253 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 306 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे 306 मृत्यू,  नागपूर-80, पुणे-49, कोल्हापूर-34, सोलापूर-30, नांदेड-16, जळगाव-11, पालघर-11, बीड-10, ठाणे-8, परभणी-0, सांगली-7, गडचिरोली-6, नाशिक-6, अहमदनगर-5, चंद्रपूर-5, रायगड-5, यवतमाळ-5, लातूर-4, सिंधुदुर्ग-3, जालना-2 आणि वाशिम-2 असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,11,03 991 प्रयोगशाळा (Laboratory) नमुन्यांपैकी 53,78,452 (17.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 34,91,981 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,398  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area