धमकी देत विवाहितेवर बलात्कार

पतीला प्रमोशन न देण्याची भीती दाखवत पतीच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं विवाहित महिलेचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी अधिकाऱ्यानं गेल्या दीड वर्षापासून अनेकदा पीडित महिलेला आपल्या वासनेचं शिकार बनवलं आहे. या प्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विवाहितेनं दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी अधिकाऱ्यावर बलात्काराचा (molestations)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सफदर अली खान असं संबंधित आरोपीचं नाव असून तो कोंढवा बुद्रुक येथील आरयुफओरीया सोसायटीतील रहिवासी आहे. पीडित महिलेचा पती आणि संबंधित आरोपी एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. तर आरोपी व्यक्ती हा संबंधित कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी वरिष्ठ अधिकाऱ्यानं पतीचं प्रमोशन न करण्याची भीती दाखवत एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार (molestations) केला आहे. (crime news)


आरोपी व्यक्तीनं 2019 पासून 11 मार्च 2021 पर्यंत अनेकदा लैंगिक शोषण केलं आहे. आरोपी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area