Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, सोने 48 हजारांच्या खाली, पटापट तपासा नवे दर

नवी दिल्लीः डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्यानं आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रीमुळे शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या किमती खाली घसरल्या. दिल्ली सराफा बाजारात दहा ग्रॅम सोन्याच्या किमतीत 205 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. एक किलो चांदीची किंमत (Silver Rate Today) 61 रुपयांनी वाढली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, जागतिक बाजारात विक्री आणि रुपया मजबूत झाल्याने सोन्यावर दबाव वाढला. (Gold Rate Today: Gold Silver Price Today 28 May 2021 Gold Declines Rs 205 Amid Muted Global Trends)

सोन्याची नवी किंमत (Gold Price on 28 May 2021)

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 205 रुपयांनी कमी होऊन 47,910 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,115 रुपयांवर बंद झाले.

चांदीची नवी किंमत (Silver Price on 28 May 2021)

त्याच वेळी चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली. एक किलो चांदीची किंमत 61 रुपयांनी वाढून 70,521 रुपये झाली. मागील ट्रेडिंग सत्रात किंमत प्रति किलो 70,460 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,891 डॉलर आणि चांदीचा भाव 27.67 डॉलर प्रति औंस होता.

सोन्यात का आली घसरण?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये वाढ आणि कॉमेक्सवर सोन्याच्या विक्रीमुळे दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 205 रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयांत 18 पैशांनी वाढ होऊन तो 72.42 रुपयांवर गेला. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांच्या म्हणण्यानुसार, डॉलर आणि अमेरिकन ट्रेझरी यील्टच्या वाढीमुळे सोन्याच्या किमतीत घट झाली.

वायदा बाजारात सोने-चांदीची घसरण

वायदा बाजारात सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. जून वायदा सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 188 रुपयांनी घसरून 48,393 रुपये झाले. जुलै चांदीच्या वायद्याचे दर 669 रुपयांनी घसरून 71,050 रुपये प्रति किलो झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area