Gold Price Today | मे महिन्यात सोने 1000 रुपयांनी महागले, गुंतवणुकीआधी जाणून घ्या ताजे दर

डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी एमसीएक्सवरील (MCX) सोन्याचे वितरण प्रति दहा ग्रॅम 47760 रुपयांवर बंद झाले. 30 एप्रिल रोजी जून डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव (Gold Rate) 46737च्या पातळीवर बंद झाले होते. अशा प्रकारे, मे महिन्यात सोन्याच्या भावात आतापर्यंत 1023 रुपयांनी वाढ झाली आहे (Gold Silver Price Today on 8 May 2021 MCX Rates).

या आठवड्याच्या अखेरच्या व्यापार सत्रात ऑगस्टच्या सोन्याचा भाव 231 रुपयांच्या वाढीसह 48150 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. हे दर स्पष्टपणे दर्शवतात की, आगामी काळात सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कमोडीटी मार्केटमधील तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे डॉलर सातत्याने कमकुवत होत आहे, म्हणूनच त्याला गती प्राप्त होत आहे. डॉलर निर्देशांक 30 एप्रिल रोजी 91.27वर होता, जो या आठवड्यात 90.21वर बंद झाला. अशा प्रकारे मेमध्ये तो 1.06 अंकांनी खाली आला आहे. जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची घट आणि घसरण हे निर्देशांक दर्शवते. जेव्हा डॉलर घसरतो तेव्हा सोन्याच्या किंमती वाढतात.


यील्डमध्ये सातत्याने घसरण

दुसरीकडे, यूएस बाँडच्या उत्पन्नातही घट नोंदवली गेली आहे. 30 एप्रिल रोजी 10 वर्षांच्या यूएस बाँडचे उत्पन्न 1.626 टक्के होते, जे या आठवड्यात 1.579 टक्क्यांवर आले आहे. यात मेमध्ये 0.47 टक्के घट नोंदवली गेली. जेव्हा जेव्हा यील्डमध्ये घट होते, तेव्हा सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येते (Gold Silver Price Today on 8 May 2021 MCX Rates).


आता सोन्याला अधिक झळाळी मिळेल

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा डेटा या आठवड्यात खाली आला आहे, ज्यामुळे डॉलरमध्ये आणखी घसरण नोंदवली जाईल. यामुळे येत्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ दिसून येईल. आपण याकडे बारीक लक्ष दिल्यास, अमेरिकन स्टॉक इंडेक्स Dow  आणि Nasdaq यांनी त्यांची सर्व-उच्च पातळी गाठली असल्याचे लक्षात येईल. अमेरिकन अर्थव्यवस्था अपेक्षित सुधारणा दर्शवत नाहीय. अशा परिस्थितीत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऐवजी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीकडे वाटचाल करतील आणि सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होईल.


आयबीजेए आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर

आयबीजेए (IBJA) वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 47484 रुपये आणि चांदीचा दर (Silver Rate) प्रति किलो 70835 रुपये होता. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, एमसीएक्सवर जुलैच्या डिलिव्हरीसाठी चांदी 181 रुपयांनी घसरून 71500 आणि सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी चांदी 466 रुपयांनी घसरून 72235 रुपये प्रतिकिलोवर आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1832 डॉलर व चांदी 27.55 डॉलरवर बंद झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area