कडक कारवाई करा; पालकमंत्री सतेज पाटील यांचे आदेश....

आठ दिवस उपचार करून शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात (hospital) पाठविण्याचा प्रताप काही खासगी रूग्णालये करत आहेत. आपल्या रुग्णायातील मृत्यूची संख्या कमी दाखविण्यासाठी सुरू असलेल्या या कारनाम्याला आळा घालण्यासाठी आता पालकमंत्री सतेज पाटीलच (political leader) आक्रमक झाले आहेत. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात गेले महिनाभर करोनाचा संसर्ग वाढला आहे. रोज हजारावर रूग्ण आढळत आहेत. सरकारी रूग्णायात उपचारासाठी बेड उपलब्ध नाहीत. अशावेळी ग्रामीण-शहरी भागात अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात असतात. या रुग्णांना लक्षणे असल्यास त्यांना आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या सूचना खासगी रुग्णालयाने द्याव्यात, असे आदेश यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, तरीदेखील काही खासगी रुग्णालये या सूचनांचे पालन करत नाहीत. किरकोळ उपचार करत वेळ घालवतात. रूग्णाचा आजार वाढल्यानंतर शेवटच्या क्षणी त्याला सरकारी रूग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या जातात.


कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढतेच आहे. सध्या अनेकांना करोना सदृश लक्षणे असूनही ते घरच्या घरी जुजबी उपचार घेत आहेत. त्यानंतर काही जण खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. तेथे उपचार सुरू झाल्यानंतर अनेक रूग्णांची प्रकृती बिघडते. शेवटच्या २४ ते ४८ तासांतील मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. हे मृत्यू लपविण्यासाठी खासगी रूग्णालये शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात रुग्णाला पाठवत आहेत. त्यामुळे काही रुग्ण दगावत असल्याचे समोर येत आहे. आपल्या रुग्णालयातील मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी ही रुग्णालये रूग्णाच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयाबाबत पालकमंत्री सतेज पाटील (political leader)  यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.


शेवटच्या वेळी गंभीर रुग्णाला सरकारी रुग्णालयात (hospital)  दाखल करण्याच्या सूचना देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. त्यांच्यावर उपचार सुरळीत व्हावेत तसेच शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात दाखल करून 'सरकारी रुग्णालयात मृत्यू' असे दाखवण्याचे प्रकार होऊ नयेत म्हणून पालकमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे. अशा रूग्णालयावर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे अशा खासगी रुग्णालयांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area