Homeopathic medicine मुळे मृत्यूप्रकरणी खळबळजनक खुलासा; मोठी माहिती उघड

 

छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये होमिओपॅथिक औषध (Homeopathic medicine) घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला . त्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली आहे. फक्त या कुटुंबानेच नव्हे तर गावातील बहुतेकांनी हे औषध घेतलं होतं आणि तेसुद्धा दारू न मिळाल्याने.

सिरगिट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरमी गावातील हे प्रकरण आहे. धुरी कुटुंबातील सदस्यांनी होमिओपॅथिक औषध ड्रोसेरा 30 (drosera 30) घेतलं. त्यानंतर या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला. त्यावेळी पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे.


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस गावात गेली तेव्हा गावातीलच एका होमिओपॅथिक  (Homeopathic medicine)  डॉक्टरांकडून या लोकांनी हे अल्कोहोलयुक्त सीरप घेतल्याचं समजलं. धुरी कुटुंबातील 9 तरुणांना दारू मिळाली नाही म्हणून त्यांनी एकत्र अल्कोहोलयुक्त सीरप घेतलं. ज्यामध्ये 91 टक्के होतं. 4 मे रोजी रात्री त्यांनी भरपूर प्रमाणात हे औषध प्यायले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. चौघांचा घरातच मृत्यू झाला. 


कुटुंबातील इतर सदस्यांना वाटलं की कोरोनामुळे या तरुणांचा मृत्यू झाला म्हणून बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी आणखी चौघांचा उपचार (Treatment) सुरू असताना मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर गावातील अनेक लोकांनी नशेसाठी म्हणून हे औषध घेतलं होतं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरमी गावात दारू न मिळाल्याने होमिओपॅथीचं एक अल्कोलयुक्त सीरप प्यायल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे. औषध देणाऱ्या बंगाली डॉक्टरला अटक केली आहे.


बिलासपूरचे एएसपी उमेश कश्यप यांनी सांगितलं, गुरुवारी गावात चौघांचा मृत्यू (Death) झाल्याची बातमी मिळाली. पोलीस गावात गेल्यानंतर प्राथमिक तपासात या तरुणांकडे दारूऐवजी होमिओपॅथिक सीरप मिळालं, ज्यामध्ये 91  टक्के अल्कोहोल होतं. यामध्ये पाणी मिसळून तरुण प्यायल्याचंही स्पष्ट झालं. त्यानंतर अनेकांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. तिथं चौघांचा मृत्यू झाला. गावात तपासणी करण्यात आली. तिथं अशी अनेकांनी हे औषध घेतल्याची प्रकरणं समोर आली, त्यापैकी काही जण गंभीर आहेत. याप्रकरणी डॉक्टरची चौकशी सुरू आहे.


छत्तीसगडमध्ये लॉकडाऊनमुळे दारूबंदी आहे. त्यामुळे दारूसाठी लोक काय काय नाही करत आहेत. कुणी सॅनिटायझर तर कुणी अशा अल्कोहोलयुक्त (Alcoholic) सीरपचं सेवन करत आहेत. तीन दिवसांपूर्वीच रायपूरमध्ये चार जणांनी स्पिरीट मिसळून सॅनिटायझर प्यायले होते. त्यावेळी तिघांचा मृत्यू झाला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area