Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत वाढविली, आता शेवटची तारीख कोणती?

नवी दिल्लीः करदात्यांसाठी एक चांगली बातमी आहे. प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. 31 जुलै 2021 ची अंतिम मुदत होती, जी आता वाढविण्यात आलीय. आता सामान्य करदाता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत रिटर्न भरू शकणार आहेत. कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे सरकारने हा निर्णय घेतलाय. कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे कंपन्या आणि सामान्य करदात्यांशी संबंधित अनेक करांच्या तारखांची मुदत वाढविण्यात आलीय. (Income Tax Return Last Date For Filing Income Tax Return (ITR) Extended, Now Last Date 30 september 2021)


प्राप्तिकराशी संबंधित कोणकोणत्या तारखा वाढवल्या, जाणून घ्या…


(1) मूल्यांकन वर्ष 2021-22 (वित्तीय वर्ष) साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 ने वाढवून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत करण्यात आलीय.


(2) इन्कम टॅक्स ऑडिट (Income for Tax Audit Assesses) अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 पासून वाढवून 30 नोव्हेंबर 2021 करण्यात आलीय. त्याचबरोबर टॅक्स ऑडिट रिपोर्ट फायनल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरहून वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आलीय.
कर तज्ज्ञ म्हणतात की, कर ऑडिट म्हणजे करदात्यांच्या खात्यांचा आढावा. अशा करदात्यांमध्ये स्वत: चा व्यवसाय आयोजित करणार्‍या किंवा व्यावसायिक सेवा पुरवणाऱ्यांचा समावेश आहे. उत्पन्न, वजावट, कर कायद्यांचे पालन इत्यादींच्या दृष्टिकोनातून या खात्यांचे पुनरावलोकन केले जाते.


(3) बिलेटेड/सुधारित आयकर विवरणपत्र भरण्यासाठी (ITR) मुदत वाढविण्यात आली. हे 31 डिसेंबर 2021 हून वाढवून 31 जानेवारी 2021 करण्यात आलीय. कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्यासाठी मूळ मुदत संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न भरले जाते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area