‘तौक्ते’ पाठोपाठ ‘यास’ चक्रीवादळाचा फेरा; नेमके कोठून आले हे वादळ? जाणून घ्या सविस्तर माहिती

                                     
नवी दिल्ली : ‘तौक्ते’ चक्रीवादळातून देश सावरत नाही तोच आता ‘यास’ वादळाचे संकट डोक्यावर घोंघावू लागले आहे. हे वादळ हळूहळू बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. पूर्व बंगालचा उपसागर आणि त्याशेजारील अंदमानच्या समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हे वादळ मंगळवारपर्यंत बंगालमध्ये धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचाही मोठा तडाखा बसण्याची भीती आहे. राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वातावरण खराब झाले असून हा ‘यास’ चक्रीवादळाचाच परिणाम असल्याचे बोलले जात आहे. हे वादळ नेमके कोठून आले, या वादळादरम्यान वारे किती वेगाने वाहणार आहेत, या वादळाचे नाव कशावरून पडले, आधी माहिती जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. या वादळाची पार्श्वभूमी आणि परिणामांवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप. (Know what is the meaning of Yas cyclone; Where exactly did this come from, know the details)


‘यास’चा नेमका अर्थ काय आहे?

प्रत्येक चक्रीवादळाला कुठले ना कुठले नाव दिलेले असते. हे नाव वेगवेगळे देश देत असतात. नुकतेच धडकून गेलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवाळाला म्यानमारने नाव दिले होते. अगदी तशाचप्रकारे ‘यास’ वादळाला ओमानच्या नावावरून नाव पडले आहे. वादळांना नाव देण्याची एक निर्धारीत प्रक्रिया आहे. त्याच प्रक्रियेला अनुसरून ‘यास’ वादळाचे नावही निर्धारीत प्रक्रियेनंतर ठेवले गेले आहे. ‘यास’ हा पर्शियन भाषेतील शब्द आहे, ज्याचा इंग्रजीमध्ये अर्थ ‘जॅस्मिन’ असा आहे. चक्रीवादळ ‘यास’ची परिणामकारकता लक्षात घेऊन ओडिसा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सची ((NDRF) पथके जागोजागी तैनात करण्यात आली आहेत. किनारपट्टी भागात लोकांना वादळाच्या धोक्याविषयी वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. बंगालच्या प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांशी विशेषत: मेदनापूर, सुंदरवन आणि आसपासच्या भागातील रहिवाशांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.


ओमानमधून आले वादळ

‘यास’ चक्रीवादळ हे ओमानमधून आले आहे. या वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका आहे. या वादळाचे केंद्र पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून सुमारे 750 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव 48 तास राहील. वादळ भीषण रूप धारण करून हाहाकार उडवून देणार आहे. याचा प्रभाव विशेषत: उत्तर-पश्चिम दिशेने ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 मे रोजी उशिरा रात्री किंवा 26 मे रोजी सकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांनी वादळाच्या भीषण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे.


‘अम्फान’सारखेच आहे ‘यास’

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये ‘अम्फान’ चक्रीवादळ धडकले होते. त्याच वादळासारखे ‘यास’ हे वादळसुद्धा विध्वंसक ठरणार असल्याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे. गेल्या काही वर्षांत भारताला अनेक वादळांचा सामना करावा लागला. देशात फणी, अम्फान आणि निसर्ग यांसारखी विध्वंसक वादळे धडकली. त्यात आता ‘तौक्ते’पाठोपाठ ‘यास’ वादळाची भर पडली आहे. ‘यास’ चक्रीवादळामुळे 26 मे रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. हे वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये धडकेल. वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसामधील वीजपुरवठा ठप्प होईल तसेच रस्त्यांचीही वाताहत होण्याची शक्यता आहे. (Know what is the meaning of Yas cyclone; Where exactly did this come from, know the details)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area