कोल्हापूरात कडक lockdown चा उडाला फज्जा


राज्यभरातच नाही तर संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा (covid-19 increased) आकडा वाढत आहे. प्रशासनाने लोकांना योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनापासून संरक्षणासाठी घरी राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने (municipal corporation) जनता कर्फ्यू, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आज सकाळी एक वेगळीच घटना पाहायला मिळाली. 

दाभोळकर कॉर्नर परिसरातील वारणा दूध विक्री केंद्रावर मोफत श्रीखंड (free shrikhand distribution) मिळत असल्याने अनेकांनी येथे रांगा लावल्या होत्या. एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असताना अशा प्रकारची घटना घडणे थोडे विलक्षण आहे.

कोल्हापुरात महापालिका (municipal corporation) प्रशासनाने कडक लॉकडाऊनचे (Kolhapur lockdown) आदेश दिले आहेत. तरीही या परिसरात मोफत श्रीखंड वाटप होत असल्याने वारणा दूध संघाच्या सभासदांनी केंद्राबाहेर गर्दी केली होती. यावेळी सभासदांसाठी श्रीखंड वाटप सुरू असलेने आम्ही येथे ते घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांना (Kolhapur police) या प्रकाराची माहिती मिळताच त्यांना कोणतीही परवानगी न घेता हे वाटप सुरू असल्याचे समजले. यावेळी त्यांनी लोकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. शिवाय केंद्रावरील श्रीखंडाचे वाटपही थांबवण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area