कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार ?

जिल्ह्यात लागू केलेल्या कडक लॉकडाऊनची मुदत रविवारी (दि. 23) रात्री 12 वाजता संपणार आहे. सोमवारपासून जिल्ह्यात सध्या सुरू असलेले कडक लॉकडाऊन (lockdown) आणखी वाढणार की राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची पुन्हा अंमलबजावणी (restriction) केली जाणार, हे शुक्रवारी स्पष्ट होईल. त्याबाबतचा निर्णय प्रशासन घेईल, अशी शक्यता आहे.

कोरोनाचा वाढत्या संसर्गांची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर 15 मे रोजी मध्यरात्री पासून या लॉकडाऊनची अमंलबजावणी सुरू केली आहे. रविवारी (दि. 23) ही मुदत संपणार आहे.


दरम्यान, किमान 14 दिवसांचे कडक लॉकडाऊन असले पाहिजे, अशी भूमिका काही लोकप्रतिनिधींनी घेतली होती. आठ दिवसांच्या या लॉकडाऊनमधील पाच दिवस पूर्ण झाले आहेत. आता तीन दिवस उरले आहेत. लॉकडाऊन काळात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. लॉकडाऊन काळात जिल्हा प्रशासनाला दूध विक्री आणि बँकेबाबत सुधारित आदेश काढावे लागले. बँका, भाजीपाला विक्री बंद (restriction) असल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे.


या सर्व पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन आणखी आठ दिवसांसाठी वाढवणार का त्यात काही सवलती देणार, का राज्य शासनाने 31 मेपर्यंत लागू केलेले लॉकडाऊन पूर्वीप्रमाणेच जिल्ह्यासाठी लागू केले जाणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area