Mumbai crime : रेल्वेतून अंमली पदार्थाची तस्करी; नालासोपाऱ्यातील तरुणीला ठोकल्या बेड्या

 

सीएसएमटी : रेल्वेतून अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्या २८वर्षीय तरुणीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस आणि नार्कोटिक्स विभागाने संयुक्त कारवाई केली. काजल सुमंतो असे या तरुणीचे नाव असून, तिच्याकडून ६५ हजार किमतीचे एमडी जप्त करण्यात आले.

मध्य रेल्वे

मुंबई विभागातील वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये मुंबई-हावडा मेलमधून एक तरुणी अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरपीएफच्या उपनिरीक्षक पल्लवी खोपडे यांच्या पथकाने स्थानकावर बंदोबस्त वाढवला. सीएसएमटी गेट क्रमांक ४मधून प्रवेश करताना संशयास्पद हालचाली करताना एक तरुणी आढळली. खोपडे तिची चौकशी करत असताना तरुणीकडे ६.५ ग्रॅमचे अंमली पदार्थ सापडले. या अंमली पदार्थांची चाचणी केल्यानंतर हे एमडी असल्याचे निष्पन्न झाले.

ही तरुणी नालासोपारा येथे राहत आहे. ग्रँट रोड स्थानक परिसरातून एमडी विकत घेतल्याची माहिती तरुणीने पोलिसांना दिली. अंमली पदार्थ बाळगणे, तस्करी करणे या गुन्हाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area