सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही', गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान!

 

'आपण सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे, झेंडे लावले पाहिजे, याची गरज नाही. लोकांना सगळं काही माहिती आहे.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह सर्वांनाच माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, यात राजकारण करू नका' अशा शब्दांत भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाजपच्या नेते (political leader) आणि पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले.


कोरोना (Corona) परिस्थितीचा आढावा घेत काय उपाययोजना करता येईल, यासाठी भाजप महानगर कार्यकारिणीची बैठक पार पडली. शनिवारी या बैठकीची सांगता झाली. यावेळी भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन करत असताना नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला.

'कोरोनाच्या काळात आपल्याला कार्यकर्ता गमावणे हे न परवडणारे आहे. अनेक कार्यकर्ते आपण आतापर्यंत गमावले आहे. पक्षाची कामं होत राहतील, पण तुमचा जीव वाचला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, पुढे अनेक कामं करता येईल. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या, ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लस घ्यावी, लोकांना लसीकरण केंद्रावर नेण्यास मदत करावी, कुणाचं झालं नाही, याची काळजी घ्यावी' अशी विनंतीही गडकरींनी केली. (politics news) 

'यात राजकारण  (politics) करू नये, आपण सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे, झेंडे लावले पाहिजे, याची गरज नाही. लोकांना माहिती आहे. यावेळी लोकांना आपण राजकारण केलं तर लोकांना हे आवडणार नाही. तुम्ही जे काही चांगले काम केले, ते लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. त्याचे क्रेडीट आपोआप तुम्हाला आणि पक्षाला मिळणार आहे' असं म्हणत गडकरी (political leader) यांनी नेत्यांना खडेबोल सुनावले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area