तरुणीवर सामूहिक बलात्कार, बॉयफ्रेंडसह तिघांना अटक

मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात असलेल्या प्रसिद्ध बँडस्टँड भागात एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (molestations) झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी तरुणीच्या बॉयफ्रेण्डसह त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत (boyfriend) बँडस्टँड येथे फिरायला गेली असता ही घटना घडली.

ही २० वर्षीय पीडित तरुणी ११ मे रोजी रात्री वांद्रे पश्चिम येथे असलेल्या बँडस्टँड या समुद्र किनारी फिरण्यासाठी गेली होती. तेथे बॉयफ्रेंडसह एकूण तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे सर्व आरोपी पीडित तरुणीच्या परिचयाचे असल्याची माहिती मिळत आहे. आरोपी हे मानखुर्द परिसरातील रहिवासी असून ते २० ते २३ या वयोगटातील आहेत.


ही तरुणी घरी आल्यानंतर तिने आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिच्या बहिणीने विचारपूस केल्यानंतर आपल्यावर सामूहिक बलात्कार (molestations)  झाल्याचा धक्कादायक प्रकार तिने उघड केला. त्यानंतर पीडितेच्या बहिणीने दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात जात सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवली. (crime news)


या प्रकरणी सुरुवातीला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण वांद्रे पोलिसांकडे देण्यात आले. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी एकूण तीन आरोपीना अटक केली आहे. सर्व आरोपींना १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहेPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area