Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात पेट्रोलची शंभरी, तुमच्या शहरातले ताजे दर काय?

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालेला पाहायला मिळत होतो. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. देशभरातील पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे. (Petrol Diesel Price Today 27 May 2021)

पाच राज्यातील निवडणुकांनंतर इंधन दरवाढ

तेल कंपन्यांनी गुरुवारी विविध शहरांमधील पेट्रोलची किंमत 18 ते 25 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमतीत 28 ते 32 पैसे प्रतिलीटरने वाढ केली आहे. याआधी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मात्र, मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.


अवघ्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांदरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र 4 मे पासून इंधनाच्या दरात वाढ सुरु झाली. यंदाच्या मे महिन्यात आतापर्यंत एकूण 15 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मे महिन्यात पेट्रोलचा दर हा 3.34 रुपये प्रतिलीटर तर डिझेलचा दर हा 3.86 रुपये प्रतिलीटरने वाढला आहे.


राज्यात पेट्रोलची शंभरी गाठणारे जिल्हे 


 • अमरावती – ₹ 100.49
 • औरंगाबाद – ₹ 100.95
 • भंडारा – ₹ 100.22
 • बुलडाणा –  ₹ 100.29
 • गोंदिया – ₹ 100.94
 • हिंगोली – ₹ 100.69
 • जळगाव – ₹ 100.86
 • जालना – ₹ 100.98
 • नंदूरबार – ₹ 100.45
 • उस्मानाबाद – ₹ 100.15
 • रत्नागिरी – ₹ 100.53
 •  सातारा – ₹ 100.12
 •  सोलापूर – ₹ 100.10
 •  वर्धा – ₹ 100
 • वाशिम – ₹ 100.34


क्रमांकशहरेपेट्रोल (रुपये)डिझेल (रुपये)
1अहमदनगर₹ 99.37₹ 89.85
2अकोला₹ 99.55₹ 90.05
3अमरावती₹ 100.49₹ 90.94
4औरंगाबाद₹ 100.95₹ 92.81
5भंडारा₹ 100.22₹ 90.69
6बीड₹ 99.92₹ 90.38
7बुलडाणा₹ 100.29₹ 90.75
8चंद्रपूर₹ 99.97₹ 90.45
9धुळे₹ 99.61₹ 90.08
10गडचिरोली₹ 101.59₹ 92.01
11गोंदिया₹ 100.94₹ 91.37
12मुंबई उपनगर₹ 99.81₹ 91.66
13हिंगोली₹ 100.69₹ 91.14
14जळगाव₹ 100.86₹ 91.28
15जालना₹ 100.98₹ 91.39
16कोल्हापूर₹ 99.94₹ 90.41
17लातूर₹ 101.22₹ 91.64
18मुंबई शहर₹ 99.71₹ 91.57
19नागपूर₹ 99.70₹ 90.19
20नांदेड₹ 101.47₹ 91.88
21नंदूरबार₹ 100.45₹ 90.89
22नाशिक₹ 99.89₹ 90.34
23उस्मानाबाद₹ 100.15₹ 90.61
24पालघर₹ 99.98₹ 90.40
25परभणी₹ 102.03₹ 92.40
26पुणे₹ 99.49₹ 89.95
27रायगड₹ 99.36₹ 89.80
28रत्नागिरी₹ 100.53₹ 90.93
29सांगली₹ 99.88₹ 90.36
30सातारा₹ 100.12₹ 90.58
31सिंधुदुर्ग₹ 101.20₹ 91.63
32सोलापूर₹ 100.10₹ 90.56
33ठाणे₹ 99.44₹ 89.88
34वर्धा₹ 100₹ 90.47
35वाशिम₹ 100.34₹ 90.80
36यवतमाळ₹ 101.03₹ 91.46

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.


पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.


त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today 27 May 2021)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area