VIDEO: गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली, पोलीस अधिकाऱ्याने वाचवला जीव

 

मुंबई: दादर रेल्वे स्थानकात नुकतीच एक थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी एक महिला आरोपी पोलिसांच्या (Police) तावडीतून पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने धाडस दाखवत या महिलेचा जीव वाचवला. (Police officer save life of criminal in Mumbai)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. दादर स्थानकातील फलाट क्रमांक चारवरुन  पोलीस महिला आरोपीला घेऊन जात होते. त्यावेळी महिला आरोपीने समोरुन येणारी लोक गाडी पाहून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा हात झटकून या महिलेने प्लॅटफॉर्मवरुन उडी मारली. पण अचानक उडी मारल्यामुळे ती तोल जाऊन खाली पडली.

त्यावेळीच समोरून लोकल ट्रेन येत होती. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी कमालीचं शौर्य दाखवत आणि सावधगिरी बाळगत ट्रेन येण्यापूर्वीच तिला ट्रॅकवरून बाजूला केले. स्टेशनवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. पळून जाणारी महिला ही एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे.

click below link to watch video

https://twitter.com/i/status/1398501726567600135


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area