‘या’ राशीच्या व्यक्तींना आवडते थाटामाटात ग्रँड लग्न, पाण्यासारखा खर्च करतात पैसा

                                

मुंबई : कोरोना काळात थाटामाटात, भव्य लग्न सभारंभांना परवानगी नाकारली आहे. पण थाटामाटात लग्न करणं कोणाला आवडत नाही? आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण म्हणून प्रत्येकजण विवाहाकडे पाहत असतो. त्यामुळे तो दिवस ग्रँड व्हावा, आपल्यासाठी खास असावा. तसेच त्या दिवसाच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहाव्यात, असे प्रत्येकाला वाटत असतं. मात्र हे शक्य करणे फार कठीण असते. पण ज्या दिवशी तो क्षण येतो, तेव्हा तो एक परिपूर्ण क्षण समजला जातो. (Zodiac signs that spend the most money in marriage)

आपल्यातील बर्‍याच जणांना भव्य लग्न आणि महागडे शौक यासारख्या बऱ्याच गोष्टी आवडत नाही. तर काहींना या विरुद्ध ग्रँड लग्न करणं आवडतं. ते नेहमी त्यांचे लग्न भव्यदिव्य व्हावं, अशी कल्पना करतात. चला तर जाणून घेऊ, अशा कोणत्या राशीचे लोक आहेत, ज्यांना ग्रँड लग्न करणे आवडते.

मेष रास

मेष राशीचे लोक अग्नी चिन्ह असतात. त्यांना ग्रँड दिखावा, लाईफस्टाईल फार आवडते. त्यांना महागडे शौक असतात. त्यामुळे स्वभावानुसार त्यांचे लग्न हे निर्विघ्नपणे व्हावे, अशी त्यांची इच्छा असते. तसेच त्यांच्या पाहुण्यांसाठी हा दिवस लक्षात राहणारा असावा,असेही त्यांना वाटते. त्यामुळे लग्नाचे नियोजन करताना एक फॅशनेबल, महागडे तसेच कोणालाही तक्रार करायला जागा उरणार नाही, असे करतात

वृषभ रास

वृषभ राशीच्या व्यक्ती या नेहमी अतिशय सुंदर, उत्कृष्ट, सर्वांचे डोळे दिपमान होईल असा विवाह सोहळा करतात. त्यांचे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष असते. त्यांचे लग्न भव्य व्हावे अशी त्यांची फार इच्छा असते. त्यांच्या लग्नात कुटुंबिय, मित्र-परिवाराने एकत्रित वेळ घालवावा, असेही त्यांना वाटते.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांना महागड्या वस्तूंचा शौक असतो. तसेच यांना दिखावा करणेही फार आवडते. त्यामुळे ते पाहुण्यांना खूश ठेवण्यासाठी लग्नात लाखोंची उधळपट्टी करतात. याचे प्लॅनिंगही जबरदस्त असते.

सिंह रास

सिंह राशीचे लोक लक्ष वेधणार आणि सोशल फ्रेंडली असतात. त्यांना आपल्या प्रियजनांबरोबर छान वेळ घालवणे आवडते. त्यांच्यासाठी विवाहसोहळा म्हणजे मौज, मजा, मस्ती करणे. ज्यामुळे ते आनंदी राहतात. या राशींच्या व्यक्तींना  महाग, भव्य आणि सर्व गोष्टी लक्षवेधी विवाहसोहळा करणं आवडतं.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area