नकळत कोरोना पॉझिटिव्ह नातेवाईकाची भेट जीवावर बेतली, सांगलीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

                                        

सांगली : नातेवाईंकांनी कोरोना झाल्याची माहिती लपवल्याने एका कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात टाकळी येथे याबाबतची घटना घडली. यात एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. बाहुबली पाटील, त्यांची आणि आणि काका अशा तीन व्यक्तींचा यात समावेश आहे. (Sangli Patil Family Three Person Died Due to Corona)

कोरोना पॉझिटिव्ह नातेवाईकाची गाठभेट

बाहुबली पाटील हे मिरज तालुक्यातील टाकळी येथे राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची आई एका नातेवाईकाची तब्ब्येत बिघडल्याने त्यांना पाहण्यासाठी गेल्या होत्या. तो नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह होता. ही माहिती बाहुबली यांच्या आईपासून लपवण्यात आली. बाहुबली यांची आई घरी परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली.


संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा विळखा

त्यापाठोपाठ बाहुबली पाटील त्यांची पत्नी, दोन काका आणि चुलत भाऊ अशा घरातील संपूर्ण कुटुंबाला कोरोनाने विळखा घातला. या कुटुंबाला सुरुवातील सौम्य लक्षण होती. त्यामुळे ते घरीच उपचार घेत होते. मात्र काही दिवसांनी बाहुबली पाटील यांच्यासह कुटुंबाची प्रकृती खालावली. त्यामुळे त्या सर्वांना कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


पाटील कुटुंबियावर दु:खाचा डोंगर

बाहुबली पाटील यांच्या पत्नीही पॉझिटिव्ह असल्या तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षण होती. त्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार सुरु होते. बाहुबली पाटील यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. यानंतर काही दिवसात बाहुबली यांच्या काकांचे निधन झाले. त्यापाठोपाठ बाहुबली पाटील यांचेही निधन झाले. यामुळे एकामागून एक झालेल्या तिघांच्या निधनाने पाटील कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेनतंर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


सांगलीतील कोरोना आकडेवारी 

सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात 1464 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 13 हजार 876 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर सांगली जिल्ह्यात आजअखेर 1 लाख 6 हजार 945 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी काल दिवसभरात 89 हजार 954 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान गेल्या 24 तासात 3115 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area