पुण्यातील डान्स टीचरचं अश्लील वर्तन; अल्पवयीन मुलीला नको त्या ठिकाणी हात लावायला पाडलं भाग, गुन्हा दाखल

पुण्यातील हिंजवडी  याठिकाणी एका डान्स टीचरने (Dance teacher) अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. आरोपी डान्स टीचरने फिर्यादी महिलेच्या घरी गेल्यानंतर, त्यांच्या घरातील एका अल्पवयीन (Minor girl) मुलीला पावडर मागण्याचा बहाणा करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीनं पीडित मुलीचा हात पकडून आपल्या प्रायव्हेट पार्टला जबरदस्तीने लावून लज्जास्पद कृत्य केलं आहे. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेनं हिंजवडी पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील वारजे माळवाडी येथील रहिवासी असणारा 40 वर्षीय आरोपी संदीप जगदीश परदेशी हा डान्स टिचर   (Dance teacher) असून तो फिर्यादीच्या घरी गेला होता. फिर्यादी यांच्या घरी त्यांच्या गावातील एक अल्पवयीन मुलगी राहते. दरम्यान आरोपी डान्स टिचर बाथरुममध्ये गेला. यावेळी त्यानं बाथरुमचा अर्धा दरवाजा उघडून पीडित अल्पवयीन मुलीला डर्मीकुल पावडरची मागणी केली. पीडित पावडर द्यायला गेली असता आरोपीनं तिला आत ओढलं आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.


आरोपी व्यक्तीनं पीडित मुलीचा हात जबरदस्तीने पकडून आपल्या प्रायव्हेट पार्टला (private part) हात लावला. संबधित घटना 05 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादीच्या घरात घडली. झालेला प्रकार लक्षात येताच हिंजवडीतील 31 वर्षीय महिलेनं हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी डान्स टीचर विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा (Crime) दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area