शासनाला मराठा समाजाची एकजूट दाखवा : समरजित घाटगे

 

यड्राव (ता. शिरोळ) येथे पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज जनजागृती संपर्क दौऱ्याच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिपती बाबर होते.

घाटगे म्हणाले, शासन मराठा समाजासाठी आरक्षण देण्यास इच्छुक नाही. मराठा समाज काही करू शकत नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीही केले तरी चालते, असा सरकारचा समज झाला आहे, हे त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयावरून स्पष्ट होते. आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाने एकसंघ व्हावे, एकत्र यावे, असे प्रत्येक जण म्हणतो व घरातच बसून राहतो. असेेे आता चालणार नाही.

मराठा समाजातील सर्वच घटकांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे. व रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. मी मराठा समाजाचे नेतृत्व करणार नाही.

स्वागत जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी सागर धनवडे, धनंजय पोकळे, विशाल पाटील, बंटी देसाई, सर्जेराव पवार, विनायक रेडेकर यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, केशव धुमाळे, विलास माने, अशोक रेंदाळे, कल्लू चव्हाण, शशिकांत कोकाटे सागर पवार, मुकुंद जगताप, मुकुंद गावडे आदी उपस्थित होते. चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले.

फोटो ओळी – यड्राव (ता. शिरोळ) येथे मराठा आरक्षणसाठी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज जनजागृती संपर्क मेळाव्यात शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर, महिपती बाबर, विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area