रत्नागिरीत मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी, तालुक्यातील 104 गावांना सतर्कतेचा इशारा

 


अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.  


नाशिक जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


नाशिक :


– चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्हा आपत्कालीन विभाग ही अलर्ट

– जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना

– तसेच नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याच केलं आवाहन

– नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात रात्री पासून ढगाळ वातावरण


रत्नागिरीत मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी, तालुक्यातील 104 गावांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी : चक्रावादळाच्या संभाव्या धोक्यामुळे प्रशान अलर्ट आज पहाटेपासून राजापूर रत्नागिरी तालुक्यात कडक संचारबंदी तर आज सायंकाळापासून गुहागर आणि दापोलीत संचारबंदी किनारपट्टी भागातील पाच तालुक्यांना अलर्ट


रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांंना सतर्कतेचा इशारा मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी


सिंधुदुर्गात वादळाचे पडसाद, पहाटे 2 पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा


सिंधुदुर्ग :

तौक्ते वादळाचे जिल्ह्यात पडसाद.


पहाटे 2 पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा

रात्री 2 पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज गायब


तर किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस।

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area