VIDEO | भररस्त्यात ‘गजराज’चा पारा चढला, ट्रकवर डोके आदळले, पुढे काय झाले ते पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल

 नवी दिल्ली : कुठलाही हटके व्हिडीओ सोशल मीडियात कुणी पोस्ट केला बस्स की काही क्षणांतच तो व्हिडीओ अनेकांपर्यंत पोहोचलेला असतो. ही एकतर सोशल मीडियाची ताकद आहे व व्हिडीओतील मजेशीर कंटेटची. बरेचसे व्हिडीओ आपली निखळ करमणूक करतात, तर काही व्हिडीओ आपल्याला चकीत करून सोडतात. हे व्हिडीओ माणसांबरोबरच प्राण्यांचेही असतात. प्राणीही काही करामती, काही गंमतीजमती करतात आणि कधी हसू तर कधी आश्चर्याचा धक्का देतात. अशाच एका हत्तीचा अर्थात गजराजाचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच हैराण करून सोडेल. हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून कित्येक लोकांचे मनोरंजन करीत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती आणि ट्रक हे दोघे आमने-सामने उभे ठाकले आहेत. (The elephant gets angry, hits the head on the truck, you will be stunned to see what happens next)


हत्ती ट्रकवर आपले डोके आदळतो

हत्ती किती विशालकाय अर्थात आकाराने भव्यदिव्य असा प्राणी आहे हे आपण ऐकतो आणि प्रत्यक्षात पाहतोही. त्यातूनच आपल्याला हत्तीच्या ताकदीची कल्पना येते. हत्तीला समोर पाहिल्यावर माणसे आणि मोठे प्राणीसुद्धा खूप लांब उभे असतात. कारण, अनेक हत्ती अचानक आक्रमक बनतात, मग त्यांच्यापासून आपली सुटका करून घेणे, आपला बचाव करणे सोपी गोष्ट नसते. आता हा व्हिडिओ स्वत: पहा आणि एक हत्ती निर्जन रस्त्यावर किती मजा करतोय, त्याचा आनंद घ्या. रस्त्यावरून एक हत्ती ऐटीत चालतो आहे. याचदरम्यान समोरून एक ट्रक येत आहे. हत्तीला पाहून ट्रक चालकाने आपला वेग कमी केला आणि हत्तीला बाजूला करण्यासाठी वारंवार हॉर्न वाजविला. तथापि, हत्तीला ते आवडले नाही. तो थेट ट्रक चालकाच्या केबिनपर्यंत पोहोचतो. यानंतर हत्ती ट्रकवर आपले डोके जोरदारपणे आदळतो. आता मात्र त्या ट्रक चालकाची पुरती बोबडी वळली होती. हत्ती आपला ट्रक पलटी करतोय, या टेन्शनने तो पुरता गर्भगळीत झाला. व्हिडीओ पाहणाऱ्यांनाही हीच चिंता सतावेल. पण तितक्यातच हत्तीचा मूड बदलतो आणि ट्रकचे कुठलेही नुकसान न करता हत्ती जंगलाकडे मोर्चा वळवतो.


व्हिडिओ पाहून स्तब्ध व्हाल!

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर स्तब्ध झाला असाल. ट्विटरवर हा व्हिडिओ भारतीय वनसेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी लिहिण्यापर्यंत सुमारे 10 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियात विविध प्रतिक्रियाही नोंदवल्या जात आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर तुम्हाला तुमच्या मनातीलच भावना व्यक्त झाल्यासारखे वाटेल. हा व्हिडीओ पाहून स्तब्ध व्हाल, पण तितकीच मज्जाही लुटाल, यात शंका नाही. (The elephant gets angry, hits the head on the truck, you will be stunned to see what happens next)


click here to watch video
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area