हळद समारंभातच तुफान राडा, दारु पिऊन विरारमध्ये गावकऱ्यांची फ्री स्टाईल हाणामारी

 विरार : विरारजवळच्या सकवार गावात ऐन हळदी समारंभातच गावकऱ्यांमध्ये राडा झाला. दारु प्यायल्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या फ्री स्टाईल फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Virar Crime news Sakwar Village Haldi Ceremony Villagers Free Style Fighting Video Social Media Viral)

विरारच्या सकवार गावात तांबडी कुटुंबामध्ये आज (रविवार) दुपारी लग्न सोहळा पार पडणार आहे. मात्र लग्नाच्या पूर्वसंध्येलाच कुटुंबात राडा झाला. लग्नाआधी आयोजित हळदी समारंभात मध्यरात्रीच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. आपापसात मारामारी करणारे याच सकवार गावातील ग्रामस्थ आहेत. कोणी दारु पिऊन धुंद होतं, तर कोणी ताडी पिऊन टाईट झालं होतं.


विरारमध्ये लग्न समारंभ नियम तुडवून सुरुच

सुनील तांबोळी यांचा विवाह रविवारी पार पाडणार असताना त्याच्या आदल्या दिवशी हा राडा झालेला आहे. सकवार गावातील हा लग्न सोहळा काही पहिलाच नाही. मागील महिन्याभरापासून इकडे अशाच प्रकारे लग्नाचा धुमाकूळ सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर लग्नात गर्दी जमत आहे.


सरपंचाच्या घराशेजारीच विवाह सोहळा

विशेष म्हणजे या गावातील सरपंच नवरदेवाच्या बाजूलाच राहतो. परंतु त्यांचं या परिसराकडे लक्ष नसावं, असंच दिसतं. आता हाणामारीचा हा व्हिडीओ समोर आल्यावर तरी पोलिस कारवाई करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


वसई विरारमध्ये कोरोनाचा कहर

वसई विरार नालासोपाऱ्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरु आहे. लग्न समारंभासाठी फक्त 25 जणांना सहभागी होण्याची परवानगी आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून दारु पिऊन राडा केल्याने या सर्वांना कोरोनाचा विसर पडला की काय असाच प्रश्न पडला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area