'उत्तर प्रदेशात 50 लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू', योगी सरकारवर चंद्रशेखर आजाद यांचा आरोप?

                                                 

पुणे: 'उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकार करोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरली असून त्यामुळे 50 लाख (50 lakh Deaths) नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा.' अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी पुण्यात (Pune) आयोजित पत्रकार परिषदेत केली.

उत्तर प्रदेशमधील भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे पुणे दौर्‍यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उत्तर प्रदेशमधील करोना रुग्णांच्या परिस्थिती बाबत विचारले असता ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेशात मागासवर्गीयांची मते मिळवून, सत्ता मिळवली आणि उच्चवर्गीय मुख्यमंत्री तिथे बसवला.'

'कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्र्यानी आरोग्य व्यवस्थेवर काम न करता. बिहार, आसाम ,बंगाल, केरळ राज्यातील निवडणुकीमध्ये लक्ष दिले. त्या दरम्यान 50 लाख रुग्णांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. मात्र सरकारकडून हे आकडे लपवण्यात आले आहे. त्यामुळे सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही.'

'हे मृत्यू नसून नागरिकांच्या हत्या आहेत. जे मृतदेह लपून ठेवले होते. ते गंगेत वाहताना दिसले. ते मृतदेह देखील आता न्याय मागत आहेत. यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.' अशी मागणी चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे.

महाराष्ट्रभरात भाजपकडून ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन केले त्यावर ते म्हणाले की, 'हे तेच भाजपचे लोक आहेत. जे पूर्ण देशामध्ये आरक्षणावर डाका घालत आहेत आणि दुटप्पीपणाने महाराष्ट्रात मोर्चा काढत आहेत. त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे.'

'भाजपपासून एससी, एसटी, ओबीसी लोकांनी सावध राहिले पाहिजे. ते दुतोंडी साप आहेत.' असं म्हणत चंद्रशेखर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

गंगा नदीच्या किनारी सापडले होते हजारो मृतदेह

गंगा नदी ही उत्तर प्रदेशातील तब्बल 27 जिल्ह्यामधून 1140 किलोमीटरचा प्रवास करून बिहारमध्ये प्रवेश करते. त्यापैकी कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलिया येथे मागील काही दिवसात अत्यंत वाईट परिस्थिती दिसून आली होती.

कानपूरमध्ये तर गंगा नदीच्या किनारी आणि पाण्यावर मृतदेह अक्षरश: तरंगताना दिसत होते. तर काही ठिकाणी उघड्यावरील मृतदेहांवर गिधाडं तुटून पडत होती. स्थानिक प्रशासन या मृतदेहांवर माती टाकून ते बुजविण्याचा प्रयत्न करत होते. पण पावसामुळे पुन्हा मृतदेह हे उघड्यावर येत होते. या सगळ्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपवर देशभरातून प्रचंड टीका करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area