दीड महिन्यापासून दीर करत होता भावजयीवर बलात्कार, बीडमधील नात्याला काळीमा फासणारी घटना

 

बीड, 31 मे: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर झोपलेल्या चुलत भावजयीवर दिराने जबरदस्तीने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यातील केज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. यात पीडितेला घराच्या बाजूला ओढत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.या प्रकरणी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलीस (Kej Police station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. घराच्या बाहेर झोपलेल्या 25 वर्षीय चुलत भावजयीला घराच्या बाजूला ओढत नेत जबरदस्तीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला तसंच या बाबत कुठे वाच्यता केली किंवा सांगितले तर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच तुझा व्हीडिओ माझ्याकडे आहे. जर कोणाला सांगितलं तर व्हिडीओ गावभर पाठवले, अशा धमक्या देत वारंवार बलात्कार करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

29 मे रोजी देखील पीडितवर अतिप्रसंग केला. मागील दीड महिन्यांपासून तो दीर हा पीडित विवाहित चुलत भावजयीवर वारंवार बलात्कार करीत होता. पीडितेला हा प्रकार सहन न झाल्यामुळे तिने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. पीडित महिलेच्या पतीने त्याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

यामुळे घाबरलेल्या पती-पत्नीने थेट केज पोलीस स्टेशन गाठले. पीडित विवाहितेच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात  नराधमाला विरुद्ध गु.र.नं. २७१/२०२१ भा.दं.वि. ३७६ (२)(एफ), ३७६ (२) (एन), ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आद्यप आरोपींला अटक केली नाही. मात्र घटनेने खळबळ उडाली आहे.

नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे केज तालुक्यात खळबळ उडाली असून घरामध्ये गावात मुलगी सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला असून कायद्याचा धाक अशा नराधमांना दाखवणे गरजेचा आहे, अशा प्रतिक्रिया सामान्य लोकातून व्यक्त केला जात आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area