अब्दुल लाट मध्ये दि. 2 जून ते 10 जून पर्यंत कडकडीत बंद.

कोणतेही दुकान किंवा आस्थापना वरील काळात सुरू राहिल्यास रु 5000 दंडाची तरतूद केली आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर रु 100 दंड आकारला जाईल. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांच्या गाड्या जप्त करून दंड आकारला जाईल. बंद काळात ज्या दुकानांवर दंडाची कारवाई होईल त्यांची दुकाने लॉक डाऊन नंतर ही 5 दिवस सक्तीने बंद ठेवण्याची कारवाई करून ती सील केली जातील. वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही परगावी जाता येणार नाही अथवा बाहेर गावाहून गावात प्रवेश दिला जाणार नाही. स्वाब तपासायला बाहेरून येणाऱ्या लॅब टेक्निशियन यांनी ग्रामपंचायतीला माहिती देणे बंधनकारक राहील. बाहेरगावच्या व्यापारी, फेरीवाले, फळ आणि भाजी विक्रेते यांना गावात प्रवेश नाही. बाहेर गावाहून वसुलीसाठी येणाऱ्या बँका, पतसंस्था व मायक्रो फायनान्स अथवा बचत गटाच्या प्रतिनिधींना वरील काळात गावात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरे आणि मशीद मध्ये अंतर्गत पूजा, विधी, नमाज पठण होईल मात्र नागरिकांना प्रवेश नाही.

अब्दुल लाट मध्ये दि. 2 जून ते 10 जून पर्यंत कडकडीत बंद. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग, व्यापार,संस्था आणि आस्थापना बंद राहणार. गावच्या चारही सीमा प्रवेशासाठी बंद. सदर लॉकडाऊन काळात पोलीस बंदोबस्त, ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय अब्दुल लाट मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाय योजनेची अंमलबजावणी करणेसाठी घेण्यात आला आहे.

हे सुरू राहणार

दवाखाने, औषध दुकाने, लॅब पूर्णवेळ, पेट्रोल पंप दूध डेअरी सकाळी 9 पर्यंत व सायंकाळी 5 ते 7:30 पर्यंत, मात्र दूध संस्थांनी ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक राहील. शेतीविषयक कामे, मजुरी सुरू राहणार.

हे बंद रहाणार

किराणा दुकाने, कापड दुकाने टेलर दुकाने, इस्त्री दुकाने, सलून दुकाने, हॉटेल, खाजगी पार्सल देणाऱ्या खानावळी, विविध खाद्य पदार्थांचे पार्सल, खाद्यपदार्थांचे गाडे, यंत्रमाग व्यवसाय, बांधकामाची कामे, पानपट्टी, भाजीविक्री बसून अथवा फिरून विकणे बंद राहील. सेवा सोसायट्या, बँका, पतसंस्था, विविध संस्था, रेशन दुकाने, खेळांची मैदाने, मॉर्निंग वॉक, सायकल दुकाने, पंक्चर दुकाने हे सगळे 100 % बंद राहतील. गावातून बाहेर जाणारे सर्व रस्ते व सीमा बंद राहतील. परगावी अत्यावश्यक सेवेतील स्टाफ किंवा नोकरी साठी जाणाऱ्यांना बाहेर सोडले जाईल मात्र त्यांचेकडे स्वाब तापसलेला रिपोर्ट आवश्यक. या ठिकाणी नेमलेल्या स्वयंसेवकांना प्रवेशाबाबत पूर्ण अधिकार समितीने दिले आहेत. त्यांच्याशी वाद घालणे अथवा त्यांचे निर्बंध मोडल्यास संबंधितांवर फौंजदारी केली जाईल.

दंडात्मक कारवाई

कोणतेही दुकान किंवा आस्थापना वरील काळात सुरू राहिल्यास रु 5000 दंडाची तरतूद केली आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर रु 100 दंड आकारला जाईल. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांच्या गाड्या जप्त करून दंड आकारला जाईल. बंद काळात ज्या दुकानांवर दंडाची कारवाई होईल त्यांची दुकाने लॉक डाऊन नंतर ही 5 दिवस सक्तीने बंद ठेवण्याची कारवाई करून ती सील केली जातील. वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही परगावी जाता येणार नाही अथवा बाहेर गावाहून गावात प्रवेश दिला जाणार नाही. स्वाब तपासायला बाहेरून येणाऱ्या लॅब टेक्निशियन यांनी ग्रामपंचायतीला माहिती देणे बंधनकारक राहील. बाहेरगावच्या व्यापारी, फेरीवाले, फळ आणि भाजी विक्रेते यांना गावात प्रवेश नाही. बाहेर गावाहून वसुलीसाठी येणाऱ्या बँका, पतसंस्था व मायक्रो फायनान्स अथवा बचत गटाच्या प्रतिनिधींना वरील काळात गावात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरे आणि मशीद मध्ये अंतर्गत पूजा, विधी, नमाज पठण होईल मात्र नागरिकांना प्रवेश नाही.

गावच्या हिताचा विचार करून काल झालेल्या सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि प्रशासन यांनी हा निर्णय घेतला असून वरील निर्बंधांचे पालन करून ग्रामस्थांनी सहकार्य करावे व होणारी दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई टाळावी. असे आवाहन गणेश सोनवणे, तलाठी राहुल माळगे ग्रामसेवक मानसिंग भोसले, पोलीस पाटील, पांडुरंग मोरे भाट, सरपंच सर्व सदस्य आणि ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती अब्दुल लाट यांचे आदेशावरून दि. 31 मे 2021.

टीप:- बंद काळात होणारी गैरसोय टाळण्यासाठी आज मंगळवार दि 1 जून रोजी किराणा आणि भाजी विक्री साठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत याची नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area