Video | वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुरु होता सराव, खतरनाक स्टंट करताना मृत्यू, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ

 

 प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे साहस दाखवून आपल्या नावावर त्या रेकॉर्डची नोंद करतात. वेगवेगळ्या प्रकारचे टास्क पूर्ण करुन हे लोक या करामती करत असतात. त्यांनी करुन दाखवलेल्या या अभूतपूर्व कामांची संपूर्ण विश्व दखल घेतं. मात्र, धाडसी कामे करुन रेकॉर्ड तयार करणाऱ्या या लोकांसोबत कधीकधी अशा काही घटना घडतात ज्या पाहून अंगाचा थरकाप उडतो. अमेरिकेतील प्रसिद्ध स्टंटमॅन अ‌ॅलेक्स हार्विल (Alex Harvill death) यांच्यासोबतही असंच काहीसं झालं आहे. एका स्टंटचा सराव करताना त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. (American stuntman Alex Harvill died while practicing bike stunt video went viral on social media)स्टंटचा सराव करताना दुर्दैवी मृत्यू

अ‌ॅलेक्स हार्विल हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध असे स्टंटमॅन आहेत. साहसी उड्या घेणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. यापूर्वी अनेकवेळा त्यांनी शेकडो फुटाच्या उंचीवरुन उड्या घेतलेल्या आहेत. सध्या ते दुचाकीवर बसून 351 फुट उंचावरुन उडी मारण्याचा सराव करत होते. याच सरावादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मोसेस लेक एअरशोमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्याची इच्छा 

मिळालेल्या माहितीनुसार अ‌ॅलेक्स हार्विल हे वॉशिंग्टन येथे सुरु असलेल्या मोसेस लेक एअरशोमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी सराव करत होते. यावेळी वॉर्मअप करताना पहिल्याच उडीदरम्यान त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. तोल ढासळल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

click below to watch video

https://twitter.com/i/status/1406151780677849088

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area