पडळकरांची बाळासाहेब थोरातांवर खालच्या भाषेत टीका, प्रत्युत्तर देताना लेकीने ‘संस्कार’ दाखवले!

                                     
मुंबई : भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्विट करून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. पडळकरांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांची लेक शरयू देशमुख (Sharayu Deshmukh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या भाषेवरुन त्यांच्या संस्काराची ओळख होते, असं म्हणत वडिलांवरच्या टीकेला शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Balasaheb Thorat Daughter Sharayu Deshmukh Answer MLC Gopichand Padalkar)

पडळकर काय म्हणाले होते…?

माझ्या हातात सूत्र द्या, ओबीसींची गेलेलं आरक्षण मिळवून देतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेतो, असं वक्तव्य फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना थोरात यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या वाद्याची आठवण करुन देत वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नव्हतात, त्याचं काय झालं? असा सवाल केला होता. हाच सवाल पडळकरांच्या जिव्हारी लागला.

थोरात यांच्या टीकेनंतर लागलीच पडळकर यांनी ट्विट करुन थोरातांवर हल्ला चढवला. ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ अशी टीका त्यांनी केली.

पडळकरांच्या टीकेला शरयू देशमुख यांचं प्रत्युत्तर

पडळकरांच्या या टीकेला आता बाळासाहेब थोरातांच्या कन्येनं सडेतोड प्रत्युत्तर देताना थेट त्यांचे संस्कारच काढले आहेत. ‘पात्रता पेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ असं प्रत्युत्तर शरयू देशमुख यांनी ट्विटद्वारे दिलं आहे.

कोण आहेत शरयू देशमुख?

शरयू देशमुख या बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील अमृतवाहिनी कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या त्या संचालक देखील आहे. सातत्याने त्यांच्या राजकी. प्रवेशाची चर्चा होत असते. मात्र त्यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केलेला नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area