मुंबई विद्यापीठाच्या अकार्यक्षम कार्यप्रणाली आणि कुलगुरु यांच्या विरोधात आनंदराज घाडगे यांचे आमरण उपोषण

मुंबई विद्यापीठाच्या अकार्यक्षम कार्यप्रणाली आणि कुलगुरु विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर, उपनगर व कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन प्रश्नासंदर्भात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनने कुलगुरू व कुलसचिव यांना वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत.

मात्र कुलगुरू व कुलसचिव यांच्याकडून जाणिवपूर्वक वारंवार केलेल्या तक्रार व कारवाईच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नियमबाह्य कार्यप्रणाली व गुंडगिरीच्या जोरावर महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय प्राचार्य धनाजी गुरव याने ताब्यात घेतले होते.धनाजी गुरव यांच्यावर आतापर्यंच १४ गुन्हे दाखल झालेले आहेत, तरीसुध्दा अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्ती प्राचार्य पदावर कशी काय बसू शकते असा सवाल गेली अनेक वर्षे आंबेडकर स्टुडंट असोसिएशन कडून विचारण्यात येत आहे.मुंबई विद्यापीठ कुलगुरू हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्राचार्य यांना अभय देत आहेत हे सिध्द होत असल्याने उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे संघटनेचे प्रवक्ता आनंदराज घाडगे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area